Join us  

मुलाच्या जन्मानंतर करिना कपूरने गर्लगँगसोबत केली पार्टी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 11:03 AM

1 / 9
सैफ अली खान व करिना कपूर खान नुकतेच आई-बाबा झालेत. गेल्या 21 फेब्रुवारीला बेबोने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तूर्तास बेबोच्या मुलाला पाहण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची रिघ लागली आहे. करिनाची गर्लगँगही बेबो व तिच्या मुलाला भेटायला पोहोचली. मनीष मल्होत्रा व करण जोहरनेही या गर्लगँगला ज्वाइन केले. मग काय, धम्माल पार्टी झाली.
2 / 9
छोट्या नवाबाला पाहण्यासाठी बेबोचा मित्र आणि बॉलिवूडचा दिग्गज फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राही पोहोचला. ते सुद्धा एका मोठ्या गिफ्टसोबत.
3 / 9
गर्लगँगचे म्हणाल तर मलायका अरोरा, करिश्मा कपूर, अमृता अरोरा, नताशा पूनावाला असे सगळे यावेळी हजर होते.
4 / 9
करिना व सैफसोबत क्वालिटी टाईम घालवल्यानंतर ही गर्लगँग फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचली. यावेळी सीमा खान आणि महीप कपूर या दोघीही दिसल्या.
5 / 9
करण जोहरही मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचला. यावेळी त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
6 / 9
गौरी खानही स्टायलिश अंदाजात मनीषच्या घरी पोहोचली. ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये ती दिसली.
7 / 9
मनीषने पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी सर्वांनी एकत्र अशी धम्माल पोज दिली.
8 / 9
या फोटोत गौरी, सीमा खान, महीप कपूर व मनीष मल्होत्रा दिसत आहेत.
9 / 9
करिना कपूरच्या घरी अमृता व मलायका या दोघी बहीणी एकत्र पोहोचल्या होत्या. मनीषच्या घरीही त्या एकत्र दिसल्या.
टॅग्स :करिना कपूरमनीष मल्होत्राकरण जोहर