Kantara : बॉलिवूडच्या चित्रपटांना पछाडत 'कांतारा' ठरला नंबर वन!, ओटीटीवर या दिवशी येणार भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 12:51 IST
1 / 7कांतारा या कन्नड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. सगळीकडे या चित्रपटाची क्रेझ इतकी आहे की ती थांबण्याचे नाव घेत नाहीये. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी होती, मात्र आता हा चित्रपट ओटीटीवर येण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2 / 7लवकरच कांतारा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.3 / 7कांतारा हा २०२२ मधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. ऋषभ शेट्टीचा चित्रपट कांतारा यापूर्वी फक्त कन्नडमध्ये प्रदर्शित झाला होता. पण प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची चर्चा सुरू आहे. 4 / 7सूत्रांच्या माहितीनुसार ऋषभ शेट्टी याचा 'कांतारा' सिनेमा अमेझॉन प्राईमवर २४ नोव्हेंबर २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अर्थात याबाबत निर्मात्यांनी याची अधिकृत घोषणा केलेली नाही.5 / 7दरम्यान, कांतारा सिनेमा ३० सप्टेंबर २०२२ रोजी कन्नड, १४ ऑक्टोबरला हिंदीमध्ये डब होऊन प्रदर्शित झाला होता. हा सिनेमाची पटकथा ऋषभ शेट्टीनं लिहिली असून त्यानंच हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.6 / 7या सिनेमाची निर्मिती विजय किरगुंडूरआणि चालुवे गौडा यांनी केले आहे. हा सिनेमा होंबळे फिल्म्स अंतर्गंत तयार केला असून त्यात ऋषभ शेट्टी याच्यासह सप्तमी गौडा, किशोर कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.7 / 7कांतारा सिनेमाला आयएमडीबीवर १० पैकी ९.५ रेटिंग मिळालं आहे. इतकेच नाही तर कांतारा सिनेमानं केजीएफ २ आणि आरआरआर सिनेमाला मागं टाकलं आहे.