घरात डॉक्टर्स आणि इंजिनिअरचा वारसा असताना शेफाली कशी बनली 'कांटा लगा गर्ल'?, किती मिळालेलं मानधन वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 08:29 IST
1 / 9काही वर्षांपूर्वी इंडस्ट्रीमधील जुन्या गाण्यांच्या रिमेकचं फॅड सुरू झालं होतं. यात 'कांटा लगा' गाण्याचंही रिमेक करण्यात आलं होतं. गाण्यात ज्या मॉडलला घेण्यात आलं होतं ती शेफाली जरीवाला आजही 'कांटा लगा गर्ल' नावानंच ओळखली जाते.2 / 9शेफाली जरीवाला त्यावेळी फक्त एक सर्वसामान्य तरुण मॉडल होती आणि एका गाण्यानं तिला रातोरात स्टार बनवलं होतं. रिमिक्स गाणं असूनही शेफालीनं आपल्या हटके अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण शेफालीला हे गाणं नेमकं कसं मिळालं होतं? तिची निवड कशी झाली होती तसंच तिला या गाण्यासाठी किती मानधन मिळालं होतं याची माहिती खूप मनोरंजक आहे. 3 / 9कांटा लगा गाण्यानंतर शेफाली खरंतर इंडस्ट्रीतून जणू गायबच झाली होती. पण जेव्हा पुनरागमन केलं त्यावेळी तिनं अनेक रिआलिटी शो केले. बिग बॉसपासून नज बलिएपर्यंत अशा रिआलिटी शोमध्ये ती दिसली. पण तिची आजही कांटा लगा गर्ल ही इमेज कायम आहे. 4 / 9शेफालीनं सांगितलं की ती आपल्या मित्रमंडळींसोबत कॉलेजच्या बाहेर उभी होती. त्यावेळी गाण्याच्या निर्मात्यांनी तिला पाहिलं. शेफालीला पाहताच तिचं गाण्यासाठी सिलेक्शन झालं होतं. 5 / 9एका आयटम साँगसाठी काम करण्याचा निर्णय घेणं शेफालीसाठी खूप कठीण होतं. कारण तिच्या कुटुंबात कुणीच मनोरंजन क्षेत्राशी निगडीत नव्हतं. उलट तिच्या घरी सर्व उच्चशिक्षीत आहेत. शेफालीच्या कुटुंबाला इंजिनिअर्स आणि डॉक्टरांचा वारसा आहे. त्यामुळे कुटुंबीयांची या गाण्यासाठी परवानगी मिळवणंही शेफालीसाठी खूप कठीण होतं. 6 / 9शेफालीनं कसंबसं आपल्या आईला समजावलं, पण वडिलांची परवानगी मिळवण्यासाठी दिग्दर्शकांनाच समोर यावं लागलं. दिग्दर्शकांनी शेफालीच्या वडिलांना विश्वासात घेतलं. त्यानंतर शेफालीला 'काटा लगा' गाणं करता आलं. 7 / 9कांटा लगा गाण्यानंतर शेफालीला अनेक चित्रपटांच्याही ऑफर्स आल्या. पण त्या तिनं नाकारल्या. कारण तिनं आपल्या वडिलांना तसं वचन दिलं होतं. त्यानुसार तिनं आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत केलं. 8 / 9इंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्यानंतर आपल्याबद्दल वेगवेगळ्या अफवा आणि नको त्या गोष्टी बोलल्या गेल्या. याचा आपल्या आयुष्यावर खूप नकारात्मक परिणाम झाल्याचंही शेफाली सांगते. कुणी सांगितलं की माझ्या भावानं मला मारलं आणि करिअर संपवून टाकलं. पण यात काहीच तथ्य नव्हतं. अशा अफवांना मी जास्त महत्व न देण्याचं ठरवलं, असंही ती सांगते. 'तुम्ही माझा द्वेश करा किंवा प्रेम करा. पण मी आहे तशीच राहणार', असंही ती ठामपणे म्हणाली. 9 / 9शेफालीनं कांटा लगा गाणं केलं तेव्हा ती नवखी होती. तिनं याआधी मनोरंजन क्षेत्रात कधीच काम केलं नव्हतं. शेफालीनं फक्त आपला छंद आणि प्रसिद्धीसाठी कांटा लगा गाणं केलं होतं. त्यामुळे तिला मानधनाचीही काही कल्पना नव्हती. तिनं सांगितलं की या गाण्यासाठी तिनं फक्त ७ हजार रुपये मानधन घेतलं होतं.