जावेद जाफरीच्या मुलीचा सोशल मीडियावर जलवा; बी-टाउनमध्ये आली चर्चेत, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST
सध्या टिंसेल टाउनमधील सौंदर्यवतींपेक्षा स्टार किड्स अधिक चर्चेत आहेत. सोशल मीडियावर सध्या या स्टार किड्सचा जलवा बघावयास मिळत असून, त्यांच्या फॅन फॉलोअर्सची संख्याही थक्क करणारी आहे. आता या स्टार किड्समध्ये अभिनेता जावेद जाफरी याच्या मुलीचे नाव समोर आले आहे. होय, जावेदच्या मुलीचा सोशल मीडियावर जबरदस्त जलवा बघावयास मिळत असून, बी-टाउनमध्ये तिची चर्चा चांगलीच रंगत आहे.
जावेद जाफरीच्या मुलीचा सोशल मीडियावर जलवा; बी-टाउनमध्ये आली चर्चेत, पाहा फोटो!
सध्या टिंसेल टाउनमधील सौंदर्यवतींपेक्षा स्टार किड्स अधिक चर्चेत आहेत. सोशल मीडियावर सध्या या स्टार किड्सचा जलवा बघावयास मिळत असून, त्यांच्या फॅन फॉलोअर्सची संख्याही थक्क करणारी आहे. आता या स्टार किड्समध्ये अभिनेता जावेद जाफरी याच्या मुलीचे नाव समोर आले आहे. होय, जावेदच्या मुलीचा सोशल मीडियावर जबरदस्त जलवा बघावयास मिळत असून, बी-टाउनमध्ये तिची चर्चा चांगलीच रंगत आहे. काही दिवसांपूर्वी डॅड जावेद जाफरीने जिम वर्कआउट करतानाचा एक फोटो शेअर करून यूजर्सचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले होते. आता त्याची मुलगीदेखील सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना आकर्षित करीत आहे. २६ वर्षीय अलाविया आपले दोन भाऊ मीजान आणि अब्बासपेक्षा मोठी आहे. सध्या ती न्यू यॉर्कला राहत असून, धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये तिने शिक्षण घेतले आहे. अलाविया श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूरची बेस्ट फ्रेंड आहे. या दोघांना बºयाचदा एकत्र बघण्यात आले आहे. अलाविया सुरुवातीला कॅमेºयासमोर जाण्यास घाबरत असे. मात्र जान्हवीसोबत राहताना तिच्या मनातील भीती कमी झाली. आता तिला लाइमलाइटमध्ये राहायला आवडत आहे. इन्स्टाग्रामवर अलाविया तिचे लेटेस्ट फोटो नेहमीच शेअर करीत असते. तिच्या फॉलोअर्सची संख्या १ लाख १७ हजारांपर्यंत पोहोचली आहे. अलाविया अभिनेता रणवीर सिंग आणि पॉप सिंग जस्टिन बीबरची मोठी फॅन आहे.