Join us  

'असं वाटतं की सैफला सोडून द्यावं आणि...', करीना कपूरचं म्हणणं ऐकून अनेकांच्या उंचावल्या होत्या भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 8:58 PM

1 / 10
करीना कपूर बेधडक आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. मग ही बाब चित्रपटाशी निगडीत असो किंवा पर्सनल लाइफशी. ती नेहमीच असे उत्तर देते की समोरच्याची बोलती बंद करून टाकते.
2 / 10
एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान करीनाला एका रिपोर्टरने नवरा सैफ अली खानबद्दल प्रश्न विचारला होता. त्याचे तिने इतक्या जहाल शब्दात उत्तर दिले की तिने इनडायरेक्ट तिला प्रश्न आवडला नसल्याचे दाखवून दिले.
3 / 10
खरेतर हा संपूर्ण किस्सा आहे की अँड का चित्रपटाच्या रिलीजच्या दरम्यानचा. या सिनेमात अर्जुन कपूरने करीना कपूरच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती.
4 / 10
या चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये करीना कपूरला एका रिपोर्टरने तिला ऑनस्क्रीन नवऱ्याची खऱ्या आयुष्यातील नवरा सैफ अली खानसोबत तुलना करणारा प्रश्न विचारला होता.
5 / 10
या प्रश्नावर बेबोने मिश्किल अंदाजात उत्तर दिले होते. ती म्हणाली होती की, अर्जुन कपूरला इतकी मेहनत घेताना पाहून असे वाटते आहे की सैफला सोडून द्यावे आणि अर्जुनसोबत लग्न करावे.
6 / 10
इतकेच नाही तर करीनाने रिपोर्टरलादेखील सुनावले. बेबो म्हणाली की, तिचे सैफची तुलना अर्जुनसोबत करणं चुकीचे आहे कारण दोघांची तुलना होऊच शकत नाही.
7 / 10
करीना कपूर आणि अर्जुन कपूरचा चित्रपट की अँड काला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. यात नवरा घरातील जबाबदारी पार पाडत असतो आणि पत्नी पैसे कमवून घरी आणत असते.वेगळी कॉन्सेप्ट असल्यामुळे प्रेक्षकांना सिनेमा आवडला होता.
8 / 10
करीना कपूर आणि सैफ अली खान बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहेत. ते दोघे बऱ्याचदा फोटोंमुळे चर्चेत येत असतात.
9 / 10
सैफ आणि करीनाने २०१२ साली साध्या पद्धतीने रजिस्टर्ड मॅरिज केले होते. सैफचे हे दुसरे लग्न आहे.
10 / 10
यापूर्वी त्याने अमृता सिंगसोबत लग्न केले होते जे फक्त १३ वर्ष टिकले. २००३ मध्ये दोघे वेगळे झाले. घटस्फोटोनंतर अमृता सिंगला सारा अली खान आणि इब्राहिमची कस्टडी मिळाली. आता सैफ आणि करीना दोन मुलांचे पालक आहेत.
टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान अर्जुन कपूर