'बाहुबली' फेम कटप्पाच्या लेकीला पाहिलंत का?, तिच्या सौंदर्यापुढे सारा, आलियादेखील आहेत फेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 14:52 IST
1 / 9कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे बाहुबली फेम कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज. सत्यराज यांची चर्चा कायम चर्चा रंगलेली असता. सत्यराज हे प्रसिद्ध अभिनेते असले तरी, त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. 2 / 9सत्यराज यांनी अनेक चित्रपटात काम केले. पण ‘बाहुबली’ चित्रपटातून त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. सत्यराज यांनी ‘बाहुबली’ चित्रपटात ‘कटप्पा’ची भूमिका साकारुन चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. 3 / 9‘कटप्पा’ भूमिकेमुळे सत्यराज एका रात्रीत चांगलेच लोकप्रिय झाले. आता सत्यराज यांच्या लेकीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सध्या सर्वत्र सत्यराज यांच्या मुलीच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे.4 / 9सत्यराज यांना दोन मुले आहेत. त्यांचा मुलगा सीबीराज वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहे, तर त्यांची लेक दिव्या कला विश्वापासून दूर आहे.5 / 9दिव्या लाइमलाइट आणि सिनेमांच्या दुनियेपासून दूर वेगळ्या क्षेत्रात स्वतःचं करियर बनवत आहे. ती व्यवसायाने पोषणतज्ञ आहे. 6 / 9दिव्या कला विश्वापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.7 / 9दिव्याचे इन्स्टाग्रामवर ३ लाख ९५ हजार फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. 8 / 9दिव्या अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या पदार्थांसंबंधित टिप्स शेअर करत असते. 9 / 9ती स्वतः फिटनेस फ्रिक आहे, एवढंच नाही तर, ती इतरांनाही फिट राहायला शिकवते.