Join us

Happy Birthday Radhika! पाहा, राधिका आपटेचे काही बोल्ड फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST

अभिनेत्री राधिका आपटे हिचा आज(७ सप्टेंबर) वाढदिवस.खरे तर ‘लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटात राधिकाने केवळ गमती-गमतीत एक छोटीशी भूमिका केली होती. पण गमती-गमतीतील हा निर्णय योग्य ठरला. स्वबळावर राधिकाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज राधिका एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

अभिनेत्री राधिका आपटे हिचा आज(७ सप्टेंबर) वाढदिवस.खरे तर ‘लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटात राधिकाने केवळ गमती-गमतीत एक छोटीशी भूमिका केली होती. पण गमती-गमतीतील हा निर्णय योग्य ठरला. स्वबळावर राधिकाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज राधिका एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.राहुल बोसने ‘बॉम्बे ब्लॅक’ या नाटकातील राधिकाचा अभिनय पाहून तिला ‘अंतहिन’ या बंगाली चित्रपटासाठी सजेस्ट केले होते. या चित्रपटात राधिकासोबत शर्मिला टागोर, अपर्णा सेन, राहुल बोस असे सगळे होते.‘शोर इन द सिटी’ या चित्रपटाने राधिकाला बॉलिवूडमध्ये ओळख दिली. त्यावेळी राधिका तिचा को-अ‍ॅक्टर तुषार कपूरला डेट करत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. अर्थात हे नाते नंतर तुटले.राधिकाचा प्रेमाचा शोध ब्रिटीश म्युझिशियन बेनडेडिक्ट टायलोपर्यंत येऊन थांबला. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेल्या या जोडप्याने २०१२ मध्ये लग्न केले.‘मांझी’ या चित्रपटात राधिका नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती. या चित्रपटाच्या सेटवर नवाजला राधिकावर सीक्रेट क्रश झाला होता.खुद्द नवाजने ही कबुली दिली होती.