Join us  

Happy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 1:50 PM

1 / 10
अनुष्का शर्मा व विराट कोहली यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालेय. आज त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी या सुंदर जोडप्याचे काही सुंदर फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...
2 / 10
अनुष्का व विराटच्या लग्नानंतर इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले. विराटने आपल्या आॅफ्रिका दौºयादरम्यान हा फोटो शेअर को होता. या दौºयात अनुष्का त्याच्या सोबत नव्हती. साहजिकचं तिच्या आठवणीत व्याकूळ होऊन विराटने हा फोटो शेअर केला होता.
3 / 10
अनुष्का व विराटच्या लग्नाचा हा फोटो कुणीही विसरू शकत नाही. हा फोटो सर्वाधिक व्हायरल झाला होता.
4 / 10
लग्नानंतर या कपलने आपले अनेक कँडिड फोटो शेअर केलेत. या फोटोत अनुष्का विराटच्या मागे उभी राहून त्याला हग करतेय.
5 / 10
हा फोटो आहे, पहिल्या दिवाळीचा. होय, लग्नानंतरची पहिल्या दिवाळीत विराट व अनुष्का पारंपरिक अंदाजात दिसलेत. हा फोटोही चाहत्यांना प्रचंड भावला.
6 / 10
लग्नानंतर नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनच्या फोटोतही विराट व अनुष्का अतिशय हॉट अ‍ॅण्ड हॅपलिंग दिसत आहेत.
7 / 10
या फोटोत अनुष्का व विराट यांच्यातील केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. यात अनुष्का विराटच्या खांद्यावर डोके ठेवून पहुडलेली दिसतेय.
8 / 10
अनुष्का व विराटच्या या फोटोने इंटरनेटवर आग लावली होती. दोघांचेही हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस लूक पाहून चाहते या कपलचे ‘दीवाने’ झाले होते.
9 / 10
विराटच्या क्रिकेट मॅचदरम्यान अनुष्का अनेकदा त्याच्यासोबत असते. हा फोटोही एका विदेश दौ-याचा आहे.
10 / 10
हा फोटो आहे अनुष्काच्या पहिल्या ‘करवाचौथ’चा. चंद्राच्या साक्षीने काढलेला दोघांचा हा फोटोही प्रचंड व्हायरल झाला होता.
टॅग्स :विराट अनुष्का लग्नविराट कोहलीअनुष्का शर्मा