Join us

गुरुपौर्णिमेनिमित सेलिब्रिटींनी मानले गुरूंचे आभार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST

'गुरूविण कोण दाखविल वाट...' हे वाक्य प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. आई वडिलानंतर गुरूचे स्थान आयुष्यात खूप महत्वाचे असते. आयुष्य घडविण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. गुरूपौर्णिमेनिमित्त मराठी इंडस्ट्रीतील कलाकार, गायक, संगीतकार, कोरिओग्राफर यांनी आपल्या गुरूविषयी असणाऱ्या भावना लोकमत सीएनएक्सच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

'गुरूविण कोण दाखविल वाट...' हे वाक्य प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. आई वडिलानंतर गुरूचे स्थान आयुष्यात खूप महत्वाचे असते. आयुष्य घडविण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. गुरूपौर्णिमेनिमित्त मराठी इंडस्ट्रीतील कलाकार, गायक, संगीतकार, कोरिओग्राफर यांनी आपल्या गुरूविषयी असणाऱ्या भावना लोकमत सीएनएक्सच्या माध्यमातून व्यक्त केल्या. अभिजीत खांडकेकर (अभिनेता) : दत्तगुरूप्रमाणेच मला देखील प्रत्येक क्षेत्रात अनेक गुरू लाभले आहेत. त्यांच्या मार्गदर्शन व आर्शिवादामुळे आज मी इथपर्यत पोहोचलो आहे. शाळेतील सुमंगल कुलकर्णी, रहाळकर बाई, पंडीत किवा भातखंडे शिक्षक असे अनेक गुरूंचा मला घडविण्यात मोठा वाटा आहे. यांच्याप्रमाणेच अशा अनेक शिक्षकांनी आमचे आयुष्य बनविले आहे. त्यामुळे आज गुरूपोर्णिमाच्या निमित्ताने या सर्व गुरूंना मनापासून वंदन करतो.अमितराज (संगीतकार) : गुरू डॉ.अनिरूद्ध जोशी हे माझे सद्गुरू आहेत तर संगीतातील गुरू म्हणजे विनोद भट व पंडीत अभ्यंकर यांच्याकडून मला खूप काही शिकण्यास मिळाले. माझ्या सद्गुरूंमुळेच आज मी या क्षेत्रात आहे. हे तिन्ही गुरू सदैव माझ्या मनात असतात. गुरूपौर्णिमेचा दिवस साधता, सकाळपासूनच नामस्मरणाने सुरूवात करेन. तसेच हा दिवस हनुमान चालिसाने सुरू झाला तर मजा येईल. त्याचबरोबर ब्रम्ह मुर्हतावर उठून रियाज करण्याची संधी मिळाली तर यापेक्षा वेगळा आनंद नाही. माझ्या या तिन्ही गुरूंची मनापासून आभार मानतो.मंगेश बोरगावकर (गायक) : माझ्या घरामध्ये चार पिढयांचा संगीताचा वारसा लाभला आहे. त्यामुळे गुरू काका बाबूराव बोरगावकर व वडील डॉ. राम बोरगावकर या दोन्हीं गुरूंकडून गुरूकूल पध्दतीने शिक्षण मिळाले. त्यामुळे याबाबतीत मी स्वत: ला खूप भाग्यवान समजतो. तसेच माझ्या रसिकांना जे काही गाण्यांमध्ये आवडते ते माझ्या गुरूंनी मला दिले आहेत. गुरूपौर्णिमेनिमित्त एवढेच वाटते की, माझ्या गुरूचे आशिर्वाद माझ्यासोबत राहावे. त्याचबरोबर प्रत्येक रसिक माझ्यावर प्रेम करतात. तसेच सरस्वती किशोरी ताई यांना देखील गुरूपौर्णिमेनिमित्त मनापासून नमस्कार करतो.उर्मिला कानिटकर (अभिनेत्री) : माझ्या आयुष्यात मला गुरू आशाताई जोगळेकर लाभल्या आहेत. त्यांच्यामुळेच आज मी डान्सर झाले आहेत. तसेच या क्षेत्रात मी यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. आज मी त्यांच्याकडून प्रेरित होऊन त्यांच्या नावाने माझे स्वत:चे डान्स स्कूल देखील ओपन केले आहे.फुलवा खामकर (कोरिओग्राफर) : हल्लीच्या काळात आपल्या शिष्याला भरभरून देण्याची परंपरा खूप कमी झालेली दिसत आहे. जे कोणी गुरू आहेत की, त्यांनी आपल्या शिष्याला भरभरून दयावे. तसेच आज आपण यांना शिकवलं तर हा बाहेर जावून शिकवेन ही जी भिती असते ती मला खूप जणांमध्ये दिसते. पण आपण ज्यावेळी मुलांना भरभरून देतो तर तेवढे आपल्याला मिळत असते. या गोष्टींवर माझा विश्वास आहे. तसेच माझ्या गुरू आशा जोगळेकर यांनी मला घडवलं आहे.सायली पंकज (गायिका) : आपले गुरू हे आई-वडील असतात त्याचबरोबर गुरूचे जे आशिर्वाद असते ते एक वेगळेच वलय असते. संगीतकार श्रीनिवास खरे यांच्याकडे आठ ते नऊ वर्षे शिकले. पण ते आज नसले तरी त्यांचे आशिर्वाद माझ्यासोबत आहेत. माझे गुरू सुरेश वाडकर यांना मी खूप मानते. या सर्व गुरूंच्या आशिवार्दाची गणनाच नाही.