Join us

​हिंदी चित्रपटातील मदत करणारे ‘गूड घोस्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 19:44 IST

बॉलिवूडमध्ये रोमांस, ड्रामा, थ्रिलर, अ‍ॅक्शन असे विविध जेनर असलेले चित्रपट आपले मनोरंजन करीत आले आहेत. रामसे ब्रदर्स यांनी हिंदी ...

बॉलिवूडमध्ये रोमांस, ड्रामा, थ्रिलर, अ‍ॅक्शन असे विविध जेनर असलेले चित्रपट आपले मनोरंजन करीत आले आहेत. रामसे ब्रदर्स यांनी हिंदी चित्रपटातून भूतां-खेतांच्या कथा मांडून लोकांचे मनोरंजन केले. रामेसे ब्रदर्सच्या हॉरर चित्रपटातील भूते विद्रूप चेहºयाचे भितीदायक होते. मनोरंजनाच्या जगातात त्यांनाही स्थान मिळाले. भूतांच्या भूमिकांची भूरळ केवळ अभिनेत्यापुरती मर्यादित न राहता ती थेट अभिनेत्रींपर्यंत जाऊन पोहचली. अनेक सुंदर नायिकांनी विद्रूप चेहरा असलेल्या भूतांच्या भूमिका साकारल्या आहेत. यात रुबाबदार व देखना चेहरा असलेले मोठे कलावंत कसे मागे राहतील. आपली चांगली इमेज कायम राखत रुपेरी पडद्यावर या अभिनेत्यांनी ‘गूड घोस्ट’ साकारणाला आहे. अमिताभ बच्चन : अँग्री यंग मॅन ही ओळख मिळविणाºया अमिताभ बच्चन यांनी कॉमेडी, रोमाँटिक व चरित्र भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ‘भूतनाथ’ या चित्रपटात भूताची भूमिका साकारली आहे. आपल्या नातवाला भेटण्याची अपूर्ण इच्छा असलेला कैलाश नाथ मृत्यूनंतर भूत होतो. त्याच्या घरी राहयला आलेल्या एका लहान्या मुलांला भिती दाखविताना त्याला त्याच्या नातवाची आठवण होते व तो भूत त्याला मदत करू लागतो. या चित्रपटात शाहरुख खान व जुही चावला यांच्याही भूमिका होत्या. भूतनाथचे दोन भाग प्रदर्शित झाले असून तिसरा भाग तयार करण्यास निर्माते उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. शाहरुख खान : रोमांसचा बादशाह असलेला शाहरुख खान याने अमोल पालेकर दिग्दर्शित ‘पहेली’ या चित्रपटात भूताची भूमिका साकारली होती. लच्छीचा (रानी मुखर्जी) विवाह व्यापारी किशनलाल (शाहरुख खान) याच्याशी झाल्यावर सासरी येत असताना एका झाडावरील भूत तिच्या प्रेमात पडते. किशनलाल व्यापाराठी परदेशी गेल्यावर भूत किशनलालचे रूप घेऊन तिच्यासोबत राहायला लागतो. दोघांचे प्रेम फुलते, गर्भवती राहिलेल्या लच्छी समोर अचानक एक दिवस पती व भूत उभे ठाकतात. भूताला काबू करण्यासाठी एक शेळीपाळ (अमिताभ बच्चन) आपल्या बुद्धीचा वापर करतो. पहेली या चित्रपटाने आॅस्क र पुरस्कारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. नसीरुद्दीन शहा : विविधांगी भूमिका साकारणाºया नसिरुद्दीन शाह याने चमत्कार या चित्रपटात आपल्या हत्येचा बदला घेण्यासाठी मदत करणाºया भूताची भूमिका साकारली होती. मुंबईत नोकरीसाठी आलेला सुंदर श्रीवास्तव अडचणीत सापडल्यावर देवाचे नाव घेत असताना मार्कोचे (नसिरुद्दीन शहा)भूत त्याची मदत करायला येते. त्याच्या बदल्यात त्याने सुंदरने मार्कोचा खुनी व एके काळचा त्याचा साथीदार कुंटाचे सत्य सर्वासमोर आणून आपण निर्दोष आहोत हे जगाला सांगावे असा करार होतो. विद्रूप चेहरा नसलेला व मदत करणारा भूत प्रथमच हिंदी चित्रपटातून दिसला.सलमान खान : बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता सलमान खान याने रोमांस व अ‍ॅक्शन व कॉमेडीचा तडका लावत ‘हॅलो ब्रदर’ या चित्रपटात  भूताची भूमिका साकारली होती. हिरो (सलमान खान) याचे रानी मुखर्जीवर असलेले प्रेम व कुरिअर कंपनीचा मालक खन्ना याने केलेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी हिरोचे भूत इन्स्पेक्टर विशालची (अरबाज खान) मदत करतो. खन्नाचा मृत्यू विशालच्या हाताने झाल्यावर हिरोचे भूत व खन्नाच्या भूताला मारून नरकात धाडतो व स्वत: स्वर्गाकडे प्रयाण करतो. या चित्रपटातील हॅलो ब्रदर व सरकी जो सर से ही गाणी सुपरहिट ठरली होती. शाहिद कपूर : बॉलिवूडचा चॉकलेट ब्वॉय शाहिद कपूरने ‘लाईफ हो तो एैसी’ या चित्रपटात भूताची भूमिका साकारली होती. या चित्रपटात संजय दत्त आधुनिक काळातला डॅशिंग यमराजच्या भूमिकेत दिसला होता. मुंबईच्या मध्यभागी असलेल्या एका बंगल्यावर नजर असलेले बिल्डर अदीच्या (शाहिद कपूर) घरावर असते. यासाठी त्याची हत्या केली जाते. मात्र आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचा सांभाळ कोण करणार हे यमराजला पटवून देण्यात तो यशस्वी ठरतो. या कामात यमराजही त्याची मदत करतो. लाईफ हो तो एैसीमध्ये अर्शद वारसीने साकारलेली भूमिका देखील मजेदार आहे. अनुष्का शर्मा : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रथमच गुड घोस्टच्या रूपात तिच्या आगामी फिलौरी या चित्रपटात दिसणार आहे. पंजाबमधील गायक ‘फिलौरी’च्या (दलजित जोसांझ) प्रेमात पडलेली शशी (अनुष्का शर्मा) आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छेमुळे भूत होते. शशी एका झाडावर वास्तव्यास असून या झाडासोबत मांगलिक असलेल्या सूरजचे लग्न लावण्यात येते. झाडाशी लग्न म्हणजेच शशीसोबतचे लग्न व शशीचे पहिले प्रेम फिलौरीची कथा या चित्रपटातून दाखविण्यात येईल असे सांगण्यात येते. वेल अनुष्काचा गुड घोस्ट चांगलाच असेल या शंकाच नाही.