Join us  

‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेखला हवंय काम, झाली बेरोजगार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 12:31 PM

1 / 9
बॉलिवूडमध्ये स्ट्रगल कुणालाच चुकलेला नाही. पण एक दिवस कोरोना सारख्या विषाणुमुळे हा संघर्ष आणखीच बिकट होईल, याचा विचारही अनेक कलाकारांनी केला नसेन.
2 / 9
पण सध्या हेच चित्र आहे. महामारीमुळे थिएटर्स बंद आहेत. लॉकडाऊनमुळे शूटींग बंद आहेत. अशात अनेकांच्या हाताला काम नाहीये. अभिनेत्री फातिमा सना शेख यापैकीच एक.
3 / 9
होय, दंगल गर्ल फातिमा लॉकडाऊनमुळे बेरोजगार होऊन घरी बसावे लागतेय. अगदी कुणी काम देता का काम, असे म्हणण्याची वेळ तिच्यावर आलीये.
4 / 9
फातिमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय़ या व्हिडीओमध्ये ती मुलाखत देताना दिसतेय. या मुलाखतीत सध्या आपल्याकडे एकही प्रोजेक्ट नसल्याचे तिने मान्य केले आहे.
5 / 9
या मुलाखतीत तिला तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत विचारण्यात आले. यावर सध्या माझ्याकडे कुठलाही नवा प्रोजेक्ट नसल्याचे तिने मान्य केलं.
6 / 9
सध्या मी घरीच आहे़ माझ्याकडे कुठलंही काम नाही. निर्मात्यांना फोन करुन काम मागतेय. आता कदाचित कोरोना संपल्यावर माझी बेरोजगारी दूर होऊ शकेल, असे ती म्हणतेय.
7 / 9
फातिमा सना शेखने बालकलाकार म्हणून आपल्या करियरची सुरूवात ‘इश्क’ चित्रपटातून केली होती. त्यानंतर चाची ४२०, बडे दिलवाले, वन टू का फोर, बिट्टो बॉस व आकाशवाणीमध्ये झळकली आहे.
8 / 9
फातिमाला ‘दंगल’ चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. 2016 साली प्रदर्शित झालेल्या दंगल चित्रपटात फातिमाने गीता फोगटची भूमिका साकारली होती.
9 / 9
लुडो, ठग्स आॅफ हिंदुस्तान, आकाश वाणी, सुरज पें मंगल भारी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली.
टॅग्स :फातिमा सना शेख