Join us

वडिल कृष्णराज राय आयसीयूत! चिंताग्रस्त दिसली ऐश्वर्या राय बच्चन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 11:53 IST

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे वडिल कृष्णराज राय यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळतेय. गेल्या दोन आठवड्यांपासून ते लीलावती ...

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे वडिल कृष्णराज राय यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळतेय. गेल्या दोन आठवड्यांपासून ते लीलावती रूग्णालयात भरती आहेत. मात्र काल त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. यानंतर ऐश्वर्या आणि तिचा पती अभिषेक बच्चन दोघांनीही लगेच रूग्णालयात धाव घेतली. ऐश्वर्या व अभिषेकचे रूग्णालयातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऐश व अभिषेक यांच्यानंतर रात्री उशीरा बिग बी अमिताभ हे सुद्धा कृष्णराज यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रूग्णालयात पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन न्यूयॉर्कमध्ये होता. त्यामुळे ऐश्वर्या एकटी तिच्या वडिलांची देखरेख करत होती. काल रात्री अभिषेक भारतात परतल्यानंतर दोघेही थेट रूग्णालयात पोहोचले. रूग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याचे वडिल कर्करोगाने ग्रस्त आहेत. कर्करोग दुसºयांना उसळून आल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून कृष्णराज  यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते. सध्या त्यांची प्रकृती कशी आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे त्यांना आणखी किती दिवस देते ठेवणार याबाबत देखील कोणतीच माहिती हाती आलेली नाही.अलीकडे ऐश्वर्या आराध्याच्या स्पोर्ट डेवर तिच्यासोबत दिसली होती. आराध्याला चिअर अप करण्यासाठी ती पोहोचली होती. आराध्याला वेळ देत असतानाच ती आपल्या वडिलांचीही काळजी घेत होती. आता अभिषेक आल्याने तोही तिच्यासोबत असणार आहे.लवकरच ऐश्वर्या आणि अभिषेक मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याची खबर आहे. ‘गुलाब जामून’ चित्रपटात अभि व ऐश एकत्र येणार असल्याचे कळते. अर्थात अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही.