महानायक अमिताभ बच्चन यांनी शेअर केले फॅमिली फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST
महानायक अमिताभ बच्चन यांनी फॅमिली अल्बममधील काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या फॉलोअर्सला खूश केले. ११ नोव्हेंबर रोजी सकाळीच त्यांनी पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन-नंदा आणि मुलगा अभिषेकचे काही फोटोज् त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केले.
महानायक अमिताभ बच्चन यांनी शेअर केले फॅमिली फोटो!
महानायक अमिताभ बच्चन यांनी फॅमिली अल्बममधील काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या फॉलोअर्सला खूश केले. ११ नोव्हेंबर रोजी सकाळीच त्यांनी पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन-नंदा आणि मुलगा अभिषेकचे काही फोटोज् त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केले. अमिताभ यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये श्वेता आणि अभिषेक बघावयास मिळत आहेत. आणखी एका फोटोमध्ये पत्नी जया आणि मुलगी श्वेता दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना अमिताभ यांनी हे माझे सर्वस्व असल्याचे म्हटले आहे. अमिताभ नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे व परिवाराचे काही फोटोज् शेअर करीत असतात. यापूर्वीही त्यांनी परिवाराचे बरेचसे फोटो शेअर केले आहेत.