Join us  

Shriya Saran : ‘दृश्यम’ फेम श्रिया सरनचं चिमुकल्या लेकीसोबत ग्लॅमरस फोटोशूट, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 6:30 PM

1 / 10
‘दृश्यम’ फेम अभिनेत्री श्रिया सरन चित्रपटातील भूमिकांसोबत तिचा फॅशन सेंस आणि स्टाईलसाठीही ओळखली जाते. सध्या तिच्या नव्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलंय.
2 / 10
होय, श्रियाने लेक राधासोबत एक खास फोटोशूट केलं आहे. चिमुकल्या राधासोबतचे श्रियाचे फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल.
3 / 10
श्रिया व तिच्या लेकीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहते या फोटोंचं कौतुक करताना थकत नाहीयेत.
4 / 10
श्रियाने 2001 मध्ये ‘इशतम’ या तेलुगू चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. 2007 मध्ये, तिने इम्रान हाश्मीसोबत ‘आवारापन’ हा चित्रपट केला होता.
5 / 10
बॉलिवूडच्या अनेक आयटम साँगदेखील ती झळकली आहे. बॉलिवूडमध्ये श्रियाला प्रसिद्धी मिळाली ती अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटातून.
6 / 10
2018 मध्ये श्रियाने तिचा बॉयफ्रेंड आंद्रेई कोशिएव्हसोबत 2018 मध्ये लग्न केलं. आंद्रेई कोशिएव्ह हा एक व्यावसायिक आणि टेनिसपटू आहे. दोघांना राधा नावाची मुलगी आहे.
7 / 10
श्रिया सरन एका मुलीची आई आहे. पण मुलीच्या जन्मानंतरही श्रिया तितकीच फिट व हॉट आहे. तिच्या फोटोंवरून ती एका मुलीची आई आहे यावर विश्वास बसत नाही.
8 / 10
श्रियाच्या दृश्यम २ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता ती कब्जा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. यात कच्चा सुदीप लीड रोलमध्ये आहे.
9 / 10
श्रियाला 2002 मध्ये दिग्गज अभिनेते नागार्जुन सोबत आलेल्या 'संतोषम' चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला. नंतर, ती चेन्नकेसवा रेड्डी, नेनुन्नू, छत्रपती, डॉन सीनू, गायत्री यासह अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये दिसली.
10 / 10
2003 मधील तुझे मेरी कसम हा श्रियाचा पहिला हिंदी चित्रपट आहे. रितेश- जेनिलियाच्या या चित्रपटात श्रियाने सहाय्यक अभिनेत्री गिरीजाची भूमिका केली होती.
टॅग्स :श्रिया सरनदृश्यम 2बॉलिवूड