आठवतेय का 'मुन्नाभाई'ची 'चिंकी'? २२ वर्षांनंतरही अभिनेत्रीचा जलवा कायम, चाहते म्हणाले- "'मुन्नाभाई ३' बनवायलाच हवा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:04 IST
1 / 7बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी केवळ त्यांच्या स्मित हास्याने लोकांवर जादू केली होती. कोणताही चित्रपट हिट करण्यासाठी त्यांची स्माइल आणि निरागसता पुरेशी होती. त्यांच्यापैकीच एक म्हणजे ग्रेसी सिंग.2 / 7ग्रेसीने तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिचे काही चित्रपट फ्लॉप झाले असले तरी, चाहत्यांची ग्रेसीबद्दल कधीच तक्रार राहिली नाही, कारण ती तिच्या अभिनयासोबतच निरागसतेने लोकांना वेड लावायची.3 / 7ग्रेसीने आफताब शिवदासानी सोबत 'मुस्कान' चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील गाणी इतकी प्रसिद्ध झाली होती की ग्रेसी सर्वत्र गाजली. हा चित्रपट २००४ मध्ये आला होता आणि ग्रेसीच्या तेव्हाच्या आणि आताच्या लूकमध्ये खूप फरक पडला आहे. 4 / 7ग्रेसी सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या तेव्हाच्या आणि आताच्या लूकमध्ये खूप फरक झाला आहे. मात्र, जी गोष्ट बदलली नाही, ती म्हणजे तिचे हसू आणि निरागसता.5 / 7ग्रेसीचा लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहे, ज्यात ती खूप वेगळी दिसत आहे. एका युजरने फोटोवर कमेंट करून लिहिले, '''मुस्कान' चित्रपट माझ्या बहिणीला खूप आवडतो, लहानपणी तिच्यासाठी सीडी प्लेयर आणि सीडी भाड्याने घेतली होती.'' 6 / 7दुसऱ्याने लिहिले, '''लगान', 'गंगाजल', 'मुस्कान' साधी अभिनेत्री जिच्यात कोणताही अॅटिट्यूड नाही.' एकाने लिहिले, ''अरे मामू, ही तर आपली चिंकी भाभी आहे.'' आणखी एकाने लिहिले, ''काय होती आणि काय झाली. ग्रेसी खूप बदलली आहे.'' 7 / 7आणखी एकाने लिहिले, ''मुन्नाभाई'मध्ये पाहिले होते तुम्हाला. २२ वर्षांनंतरही तू तशीच आहेस. मुन्नाभाई ३ मध्ये फक्त तुम्हाला बघायचे आहे.'