तुम्हाला माहीत आहे का सुपरस्टार रजनीकांत आहेत या अभिनेत्याचे मोठे चाहते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 13:14 IST
कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार रजनीकांत यांचा आज(12 डिसेंबर ) वाढदिवस. आज ते ६५ वर्षांचे झाले आहेत. तामिळनाडूच्या ...
तुम्हाला माहीत आहे का सुपरस्टार रजनीकांत आहेत या अभिनेत्याचे मोठे चाहते?
कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार रजनीकांत यांचा आज(12 डिसेंबर ) वाढदिवस. आज ते ६५ वर्षांचे झाले आहेत. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनामुळे आजचा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन रजनीकांत यांनी चाहत्यांना केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठेही पोस्टर्स किंवा बॅनर्स लावू नयेत,असे त्यांनी सांगितले आहे. रजनीकांत यांच्या इच्छेनुरूप त्यांचा वाढदिवस आज साजरा होणार नाही. पण प्रत्येक चाहता त्यांना मनातून शुभेच्छा मात्र देईल. आज वाढदिवशी रजनीकांत यांच्याबद्दल जाणून घेऊ यात काही खास गोष्टी... रामोजी राव आणि जिजाबाई गायकवाड या महाराष्ट्रीय दांपत्याचा चार मुलांपैकी सर्वात धाकटा मुलगा म्हणजेच शिवाजीराव गायकवाड. याचा जन्म १२ डिसेंबर १९५० मध्ये बंगलोर येथील म्हैसूरमध्ये म्हणजे आताच्या कर्नाटक राज्यात झाला. त्याला दोन मोठे भाऊ आणि एक बहीण होती. शिवाजी गायकवाड ऊर्फ रजनीकांत यांचे वडील बेंगलोर येथे पोलीस कॉन्स्टेबल होते. महाराष्ट्रातील सर्वात शूर व्यक्तिमत्त्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून रजनीकांतच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव शिवाजीराव ठेवले. कर्नाटक राज्यात राहात असलेले गायकवाड कुटुंबीय घरात मराठी आणि बाहेर कन्नड भाषा बोलत. रजनीकांत, कमल हासन आणि दिग्दर्शक के. बालचंदररजनीकांत यांचे प्राथमिक शिक्षण गावीपुरम गव्हर्नमेंट कन्नडा मॉडेल प्रायमरी शाळेत झाले. पुढील शिक्षण आचार्य पाठशाला पब्लिक स्कूलमध्ये झाले. या शैक्षणिक कारकिर्दीत रजनीकांत यांनी शाळेच्या अनेक नाटकांमध्ये कामे केली. तसेच घरची परिस्थिती गरिबीची असल्याने बेंगलोर आणि चैन्नई या दोन्ही ठिकाणी सुतारकाम, गोण्या नेण्याचे, हमालीचे काम केले.रोज १८० गोण्या नेल्यानंतर दिवसाच्या शेवटी सहा रुपये मिळत असत. शेवटी बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशनमध्ये त्यांनी कंडक्टरचीही नोकरी केली. ही त्यांची शेवटची नोकरी. अशातच अभिनय प्रशिक्षण शिबिराची मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटची जाहिरात आली. घरच्यांचा विरोध असतानाही रजनीकांतसोबत काम करणा-या राज बहादूर या मित्राने रजनीकांत यांना प्रोत्साहन दिले. त्यांचे पैसेही भरले.मद्रासला जाण्याचेही पैसे दिले. या इन्स्टिट्यूटमध्ये राहून प्रशिक्षण घेत असताना आणि रंगभूमीवर काम करणा-या रजनीकांत यांच्यामधील अभिनय गुण हेरून तामिळ चित्रपट दिग्दर्शक के. बालचंदर यांनी त्यांना तामिळ शिकून घेण्यास सांगितले. रजनीकांत यांनी तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटातसुद्धा काम केले आहे. अद्याप त्यांनी मराठी चित्रपटात काम केलेले नाही. फार कमी लोकांना माहित असेल पण रजनीकांत यांची मातृभाषा मराठी आहे. कमल हासन हा रजनीकांत यांचा आवडता अभिनेता आहे. अनेक चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे. शाळेपासूनच रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती. शाळेतील अनेक नाटकांमधून त्यांनी खलनायकाची भूमिका केली आहे. रावणाची भूमिका करायला त्यांना फार आवडायचे. प्रत्येक चित्रपटानंतर रजनीकांत काही काळासाठी ब्रेक घेऊन हिमालयाच्या भेटीला जातात. त्यांच्या प्रत्येक हिमालय भेटीत हृषिकेश येथील हॉटेलमध्ये त्यांची नेहमीची ठरलेली खोलीच त्यांना दिली जाते.असे सांगितले जाते की लहान असताना रजनीकांत त्यांच्या भावाला गोष्टी आणि आई जक्कुबाईचे किस्से सांगण्यासाठी त्रास देत असत. रजनीकांत दररोज सकाळी ५ वाजता उठतात. ध्यानधारणा करतात. फिटनेससाठी संध्याकाळी तासभर ते चालतात. रजनीकांत यांना त्यांच्या फार्म-हाऊसवर राहायला आवडत असून, क्वचित प्रसंगी ते बॉइज गार्डन येथील त्यांच्या घरी राहतात. बॉइज गार्डन येथील घरात पूजा आणि ध्यानधारणेसाठी वास्तूशास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे एक खोली बनवून घेतलेली आहे. बºयाच वेळा ते या खोलीत ध्यानधारणा आणि प्रार्थना करण्यात आपला वेळ घालवतात.