डिम्पल गर्ल प्रीती झिंटा पतीसोबत याठिकाणी करीत आहे हॉलिडे एन्जॉय, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST
अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या पती जीन गुडइनफ आणि फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. प्रीती पहिल्या फॅमिली हॉलिडेसाठी सध्या साउथ आफ्रिकेत असून, त्याबाबतचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
डिम्पल गर्ल प्रीती झिंटा पतीसोबत याठिकाणी करीत आहे हॉलिडे एन्जॉय, पहा फोटो!
अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या पती जीन गुडइनफ आणि फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. प्रीती पहिल्या फॅमिली हॉलिडेसाठी सध्या साउथ आफ्रिकेत असून, त्याबाबतचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रीतीने तिच्यापेक्षा वयाने १० वर्ष लहान असलेल्या जीन गुडइनफ या अमेरिकन सिटीजनसोबत लग्न केले. गेल्यावर्षी २९ फेब्रुवारी रोजी दोघेही लॉसस एन्जलिस येथे विवाहाच्या बंधनात अडकले. दोघांनी अतिशय गुपचूप लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटो तब्बल सहा महिन्यांनंतर मीडियात प्रसिद्ध झाले. रिपोर्ट्सनुसार, प्रीती आणि जीनची भेट काही वर्षांपूर्वी अमेरिका ट्रीपदरम्यान झाली होती. जीन नेहमीच प्रीतीला सपोर्ट करीत असतो. २०१५ मध्ये आयपीएल फायनललादेखील जीन प्रीतीसोबत आला होता. त्यानंतर दोघे अमेरिकेला रवाना झाले. सुरुवातीला अशी बातमी समोर आली होती की, प्रीती झिंटा तिच्या लग्नाच्या फोटोंचा लिलाव करणार. या लिलावातून जो पैसा येईल तो अनाथालय आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दिला जाणार होता. लग्नाच्या फोटोंचा लिलाव करण्याचा ट्रेंड हॉलिवूड अभिनेत्री अॅँजेलिना जोली आणि ब्रॅड पिटने सुरू केला. त्यानंतर जॉर्ज क्लूनी आणि अमाल अलामुद्दीन यांनीही असेच काहीसे केले. प्रीतीचे नाव बिझनेसमॅन नेस वाडिया यांच्यासोबतही जोडले गेले आहे. दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले. २०१४ मध्ये आयपीएल सामन्यादरम्यान दोघांमध्ये वाद झाला अन् ते विभक्त झाले.