Join us  

अमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को...! बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा

By रूपाली मुधोळकर | Published: September 27, 2020 5:08 PM

1 / 10
अमिताभ बच्चन यांनी लेक श्वेता हिच्यासोबतचे दोन फोटो शेअर करत ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा दिल्यात. हर दिन समर्पित अपनी बेटी को... असे ट्विट त्यांनी केले.
2 / 10
यू आर माय डेफिनेशन ऑफ परफेक्ट, असे लिहित अक्षय कुमारने लेकीसोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट केला.
3 / 10
संजय दत्तची पत्नी मान्यताने संजय आणि मुलगी इकाराचा एक सुंदर फोटोे इन्स्टास्टोरीवर शेअर केला. यात संजयने मुलीला घट्ट कवटाळले आहे.
4 / 10
अजय देवगणने लेक न्यासाचा सुंदर फोटो शेअर केला. माझी मुलगी, माझी परखड टीकाकार, माझी सर्वात मोठी कमजोरी आणि माझी सर्वात मोठी ताकद आहे. आता ती तरूण झालीये. पण माझ्यासाठी आणि काजोलसाठी ती नेहमी बेबी गर्ल असेन, असे त्याने लिहिले आहे.
5 / 10
शिल्पा शेट्टी हिनेही मुलगी समीशासोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा दिल्यात.
6 / 10
कुणाल खेमूने मुलीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला.
7 / 10
अभिनेत्री नेहा धूपियाने मुलगी मेहरचा सुंदर फोटो शेअर केला. हॅपी डॉटर्स ड असे तिने तिला लिहिले.
8 / 10
आयुष्यमान खुराणाने बहामास येथील मुलीचा एक सुंदर फोटो शेअर करत ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा दिल्यात.
9 / 10
आयुष्यमानची पत्नी ताहिरा हिनेही मुलीसोबतचा एक फोटो शेअर करत ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा दिल्यात.
10 / 10
सोनी राजदान यांनी आलिया व शाहीन या दोन्ही मुलींची फोटो शेअर करत डॉटर्स डेच्या शुभेच्छा दिल्यात.
टॅग्स :बॉलिवूड