Join us  

डोले-शोले…!! चंकी पांडेचे हे गजब फोटो पाहून हसू आवरणार नाही...! जुने फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 8:00 AM

1 / 7
चंकी पांडे, बस नाम ही काफी है...! होय, खरे तर चंकीची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. आजही तो फिल्म इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह आहे. चंकी पांडेची आठवण कशासाठी? तर सध्या त्याचे काही जुने फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
2 / 7
होय, अनेक वर्षांपूर्वी चंकीने हे वर्कआऊट फोटोशूट केले होते. कदाचित त्याच्या पहिल्या सिनेमानंतर. आता इतक्या वर्षांनंतर हे फोटो व्हायरल होत आहेत.
3 / 7
या फोटोत चंकीचा अवतार पाहून कोणालाही हसू आवरणार नाही. चंकीचे फॅन असाल तर तुम्हाला हे फोटो पाहताना मज्जाच येईल.
4 / 7
आज चंकी 58 वर्षांचा आहे. पण त्याची अनोखी स्टाईल आणि स्वॅग आजही कायम आहे.
5 / 7
1987 साली ‘आग ही आग’ या सिनेमातून चंकीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
6 / 7
यानंतर पाप की दुनिया, तेजाब, आंखें यासारख्या सिनेमात दिसला. चंकीने हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. पण पुढे हिरोचा भाऊ किंवा मित्र अशाच भूमिका त्याच्या वाट्याला आल्या.
7 / 7
चंकीने करिअरमध्ये 80 पेक्षा अधिक सिनेमात काम केले आहे. बांगलादेशी सिनेमातही त्याने नशीब आजमावले. 2003 साली त्याने दमदार कमबॅक केले.
टॅग्स :चंकी पांडे