Join us  

Christmas 2020 : अमिताभ, कंगना, करिना सगळ्यांनी असा साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 12:53 PM

1 / 16
अमिताभ यांच्या बंगल्यावर संपूर्ण कुटुंबाने ख्रिसमस साजरा केला. अमिताभ, जया, अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या, मुलगी श्वेता, नात नव्या नवेली आदींनी धम्माल सेलिब्रेशन केले.
2 / 16
जया बच्चन व त्यांची नात यांनी यावेळी अशी मस्त पोज दिली. आजी-नातीच्या या फोटोवर सगळेच फिदा झालेत.
3 / 16
सैफिना अर्थात सैफ अली खान व करिना कपूरच्या घरीही नाताळची पार्टी झाली. पार्टी छोटेखानी असली तरी उत्साह शिगेला पोहोचला होता.
4 / 16
बेबोच्या घरी रंगलेल्या ख्रिसमस पार्टीत सगळ्यांनी धम्माल मज्जा केली. करिश्मा कपूर, सोहा अली खान यांनी ग्रॅण्ड डिनर केले.
5 / 16
करिश्मा कपूरनेही दणक्यात ख्रिसमस साजरे केले. तिने हा एक सुंदर फोटो शेअर केला.
6 / 16
सैफ अली खानची बहीण सोहा खान व कुणाल खेमू यांच्या घरीही नाताळ साजरा झाला. मुलगी इनायासोबत सोहाने नाताळची तयारी केली.
7 / 16
कंगना राणौत हिनेही हिमाचल प्रदेशातील आपल्या घरी संपूर्ण कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. यावेळी भाच्यासोबत तिने मस्त पोज दिल्यात.
8 / 16
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा उत्साह तर ओसंडून वाहत होता. मुलासोबत तिनेही धम्माल मज्जा केली.
9 / 16
किम शर्माने इन्स्टावर ख्रिसमसचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
10 / 16
अनन्या पांडे हिनेही ख्रिसमस साजरा केला. त्याचे फोटो तिने शेअर केलेत.
11 / 16
अभिनेत्री सोनल चौहान हिचा उत्साह तर शिगेला पोहोचला होता.
12 / 16
संजय कपूरची लेक शनाया कपूर हिने कुटुंबासोबत दुबईत नाताळचा सण साजरा केला.
13 / 16
प्रियंका चोप्रा व निक जोनास ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला असे एन्जॉय केले.
14 / 16
सनी लिओनीने पती व मुलांसोबत ख्रिसमस साजरा केला.
15 / 16
मलायका अरोराने फॅमिलीसोबत सेलिब्रेशन केले.
16 / 16
टीव्ही स्टार एरिका फर्नांडिस हिने मैत्रिणींसोबत नाताळ साजरा केला.
टॅग्स :करिना कपूरअमिताभ बच्चनकंगना राणौतबॉलिवूडनाताळ