पडद्यावर ‘ real age ’ साकारणारे सेलिब्रिटी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 17:59 IST
पन्नाशी ओलांडलेला शाहरूख खान आणि सलमान खान पडद्यावर पाहणे कुणालाही फारसे आवडणार नाही. त्यामुळे बॉलिवूडमधील ‘खान’चं नाही तर सर्वच ...
पडद्यावर ‘ real age ’ साकारणारे सेलिब्रिटी!!
पन्नाशी ओलांडलेला शाहरूख खान आणि सलमान खान पडद्यावर पाहणे कुणालाही फारसे आवडणार नाही. त्यामुळे बॉलिवूडमधील ‘खान’चं नाही तर सर्वच कलाकारांचा ख-या वयापेक्षा कमी वयाच्या भूमिका साकारण्याकडे कल असतो. अर्थात याला अपवादही आहेत. आमीर खान, शाहरूख खान, ऐश्वर्या राय बच्चन हे कलाकार आपले खरे वय पडद्यावर दाखवण्यास जराही कचरले नाहीत. अशाच काही कलाकारांची माहिती खास तुमच्यासाठी... आमीर खान :‘दंगल आमीर खान सध्या ‘दंगल’मुळे चर्चेत आहे. कालपरवाच ‘दंगल’चा ट्रेलर लॉन्च झाला. यात आमीरने माजी कुस्तीपटू महावीर सिंह फोगाट यांची भूमिका साकारली आहे. वयाने मोठ्या असलेल्या महावीर यांची भूमिका साकारताना आमीर जराही कचरला नाही. या चित्रपटात आमीरने तरूणपणातील महावीरसिंह आणि म्हातारवयातील महावीरसिंह अशा दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. वयापेक्षा मोठी भूमिका साकारण्यासाठी धाडस लागते आणि आमीरने ‘दंगल’मध्ये ते धाडस दाखवलेयं.शाहरूख खान : डिअर जिंदगी ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटात शाहरूख हा आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. आता शाहरूख व आलियाचा रोमान्स पडद्यावर पाहायला तुम्हाला आवडले असते? नक्कीच नाही. ही केमिस्ट्री निश्चितपणे ‘आॅड’ अशीच ठरली असती. त्यामुळेच ‘डिअर जिंदगी’मध्ये शाहरूख आलियाचा मार्गदर्शक म्हणून दिसणार आहे. शाहरूखने यात खºया अर्थाने ‘रिअल एज’ भूमिका साकारली आहे. किमान चित्रपटाच्या टीझरवरून तरी तसेच वाटते आहे.ऐश्वर्या राय बच्चन : ऐ दिल है मुश्किल ‘ऐ दिल है मुश्किल’ या करण जोहर दिग्दर्शित चित्रपटात ऐश्वर्या तिच्यापेक्षा कमी वयाच्या रणबीरसोबत रोमान्स करताना दिसणार असली तरी यातील तिची भूमिका ‘रिअल एज’ भूमिका आहे. ऐश्वर्याचा हॉट अॅण्ड ब्युटिफुल अवतार पाहून तांत्रिकदृष्ट्या कदाचित हे खरे वाटणार नाही, पण तसेच आहे. चित्रपट पाहिल्यानंतर कदाचित ते तुमच्याही लक्षात येईल.अक्षय कुमार : एअरलिफ्ट बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला तिशीतल्या हिरोसारख्या भूमिका साकारताना फार काळ तुम्ही बघू शकणार नाही. कदाचित स्वत: अक्षयलाही हे कळले असावे. त्याची चित्रपटांची बदललेली टेस्ट यावरून हे दिसतेय. यावर्षाच्या सुरुवातीला अक्षयचा ‘एअरलिफ्ट’ बॉक्सआॅफिसवर हिट ठरला. या चित्रपटातील अक्षयची भूमिका त्याच्या वयाला साजेशी होती. किंबहुना अक्षयने त्याचे खरे वय पडद्यावर साकारले. पत्नी, मुलगी, काहीशी पांढरी झालेली दाढी अशा अवतारातील अक्षय म्हणजे खºया खुºया आयुष्यातील अक्षयच म्हणा ना!श्रीदेवी: इंग्लिश-विंग्लीश ‘इंग्लिश-विंग्लीश’पेक्षा दुसरा कुठलाही चित्रपट श्रीदेवीच्या कमबॅकसाठी योग्य ठरला नसता. या चित्रपटातील श्रीदेवीने साकारलेली गौरी शिंदे प्रेक्षकांना प्रचंड भावली. एक निष्पाप गृहिणी तिने रंगली. खºया खुºया आयुष्यात अद्यापही पूर्वी इतकीच ग्लॅमरस दिसण्याचा श्रीदेवीचा प्रयत्न असतो. पण या चित्रपटात श्रीदेवीने अगदी रिअल एज भूमिका साकारून सगळ्यांची मने जिंकली.अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन म्हणजे ‘प्लेर्इंग दी एज’चे मास्टर. ‘चीनी कम’आणि ‘नि:शब्द’मध्ये त्यांनी ‘रिअल एज’ भूमिका साकारली. खरे तर ७४ वर्षे वयांच्या अमिताभ यांनी पन्नासीचा हिरो रंगवावा, अशी अपेक्षाही नाही. तशी त्यांची इच्छा असली तरी ती पूर्ण होणारी नाही. पण अमिताभने वयासोबत वयाला साजेशा भूमिका करणे सुरु केले. अशा भूमिका करण्यात ते कधीही कचरले नाहीत.