रितेश देशमुखला पत्नी जेनेलियाने गिफ्ट केलेली कार देशात केवळ एकाच व्यक्तीकडे, जाणून घ्या कारचे वैशिष्ट्ये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST
अभिनेता रितेश देशमुख याने काही दिवसांपूर्वीच त्याचा ३९वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या या बर्थ डेला पत्नी जेनेलिया हिने त्याला एक स्पेशल गिफ्ट दिले. जेनेलियाचे हे गिफ्ट खरंच खूप स्पेशल होते. कारण तिने रितेशला गिफ्ट केलेली कार संपूर्ण भारतात रितेशव्यतिरिक्त फक्त एकाच व्यक्तीकडे आहे. जेनेलियाने रितेशला टेस्ला मॉडेलची एक्स कार गिफ्ट केली. रितेशने ट्विटरवर या कारसोबतचा एक फोटो शेअर करताना लिहिले होते की, ‘जेनेलियाला माहिती आहे की, ४०च्या बर्थ डे बॉयला २० वर्षाच्या वयाचा अनुभव कसा द्यायचा’ ही कार अद्यापपर्यंत भारतात लॉन्च झालेली नाही.
रितेश देशमुखला पत्नी जेनेलियाने गिफ्ट केलेली कार देशात केवळ एकाच व्यक्तीकडे, जाणून घ्या कारचे वैशिष्ट्ये!
अभिनेता रितेश देशमुख याने काही दिवसांपूर्वीच त्याचा ३९वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या या बर्थ डेला पत्नी जेनेलिया हिने त्याला एक स्पेशल गिफ्ट दिले. जेनेलियाचे हे गिफ्ट खरंच खूप स्पेशल होते. कारण तिने रितेशला गिफ्ट केलेली कार संपूर्ण भारतात रितेशव्यतिरिक्त फक्त एकाच व्यक्तीकडे आहे. जेनेलियाने रितेशला टेस्ला मॉडेलची एक्स कार गिफ्ट केली. रितेशने ट्विटरवर या कारसोबतचा एक फोटो शेअर करताना लिहिले होते की, ‘जेनेलियाला माहिती आहे की, ४०च्या बर्थ डे बॉयला २० वर्षाच्या वयाचा अनुभव कसा द्यायचा’ ही कार अद्यापपर्यंत भारतात लॉन्च झालेली नाही. देशातील एक मोठ्या व्यावसायिकाने सर्वांत अगोदर ही कार अमेरिकेतून मागविली होती. वास्तविक ही कार अद्यापपर्यंत भारतात लॉन्च झालेली नाही. त्यामुळेच या बॅनरवर लिहिले आहे की, भारतात पहिल्यांदाच टेस्ला कार! अमेरिकन कंपनीच्या या इलेक्ट्रॉनिक कारमध्ये एकावेळेला सात लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कारचे मागच्या बाजूचे दरवाजे वरच्या बाजूने उघडत असल्याने हे या कारचे वैशिष्ट्ये आहे. शिवाय ग्राहकांना त्याविषयी प्रचंड आकर्षण आहे. या कारविषयी मिळालेल्या माहितीनुसार, एकदाच चार्ज केल्यानंतर ही कार पाचशे किलोमीटर धावू शकते. ० ते ९६ प्रतिकिलोमीटर या कारचा ताशीवेग आहे. २.९ सेकंदातच ही कार पिकअप घेते. जेनेलिया आणि रितेशने २०१२ मध्ये विवाह केला. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. जेनेलिया आणि रितेशने २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. याव्यतिरिक्त त्यांनी ‘मस्ती’ आणि ‘तेरे नाल प्यार हो गया’ या चित्रपटातही काम केले. बॉलिवूडमधील सर्वाधिक क्यूट कपल म्हणून या दाम्पत्याकडे बघितले जाते.