Join us  

Raj Kundra Arrest: पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अटकेत, कुठे आहे पत्नी शिल्पा शेट्टी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 4:35 PM

1 / 8
बॉलीवुड अभिनेत्री आणि फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टी सध्या रिअ‍ॅलिटी शो सुपर डान्सर 4 जज करत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पती राजला अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अ‍ॅपच्या माध्यमाने रिलीज करण्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर, शिल्पा शोच्या शूटिंगसाठी गेली नाही. (Businessman Raj kundra arrested pornographic content case but where is actress Shilpa Shetty)
2 / 8
डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी शिल्पाचा शोच्या शूटिंगचा शेड्यूल होता. मात्र, ती शूटसाठी गेली नाही. कारण सोमवारी रात्रीच तिचा पती राज कुंद्राला मुंबई क्राइम ब्रांचने अटक केली होती.
3 / 8
माध्यमांतील वृत्तांनुसार, अभिनेत्री शिल्पा सध्या आपली बहीण शमिता आणि आईसोबत जुहू येथील बंगल्यात आहे. शिल्पा शो सुपर डान्समुळे नेहमीच चर्चेत असते.
4 / 8
शिल्पाच्या पतीवर गंभीर आरोप झाले आहेत. त्याच्यावर अश्लील फिल्म्स तयार करणे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा आरोप आहे. वृत्त असेही आहे, की दर आठवड्याला एक फिल्म रिलीज केली जाते.
5 / 8
राज शिवाय इतरही 5 लोकांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये याप्रकरणी केस दाखल करण्यात आली होती. राजचे व्हाट्सअ‍ॅप ग्रुप चॅटही समोर आले आहे. या ग्रुपच्या माध्यमाने राज बिझनेससंदर्भात चर्चा करत होता.
6 / 8
मंगळवारी राज कुंद्राला न्यायालयात हजर करण्यात आले होते. आता त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
7 / 8
शिल्पाच्या वर्क फ्रंटसंदर्भात बोलायचे झाल्यास, ती चित्रपटात कमबॅक करत आहे. ती हंगामा-2 मध्ये दिसेल. या चित्रपटात परेश रावल आणि मिजान जाफरीही आहे. या चित्रपटाचे गाणेही रिलीज झाले आहे.
8 / 8
फोटोज - शिल्पा आणि राज कुंद्रा इंस्टाग्राम
टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूडराज कुंद्रा