Join us  

Adnan Sami : हुबेहुब वडिलांची कॉपी दिसतो सिंगर अदनान सामीचा मुलगा, दोन मुलींचा आहे पिता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 8:00 AM

1 / 9
सिंगर अदनान सामीने अलीकडे आपल्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर करत, सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या फोटोंमध्ये अदनान पत्नी व मुलीसोबत दिसला होता. पण अदनानला एक मुलगा सुद्धा आहे. तो पाकिस्तानात राहतो.
2 / 9
अदनानने 1993 साली पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियारसोबत लग्न केलं होतं. होय, ‘हिना’ चित्रपटात झळकलेली तीच ती जेबा. दोघांचा एक मुलगा आहे अजान सामी खान.
3 / 9
अदनान व जेबाचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नानंतर तीनच वर्षांत दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मुलगा अजान हा आईसोबत पाकिस्तानात राहू लागला आणि तिथेच लहानाचा मोठा झाला.
4 / 9
अजानचे बालपणीचे फोटो फारच क्यूट आहेत. त्याला पाहून अदनानची आठवण येते. आता अजान दोन ुलांचा बाप आहे आणि दिसायला हुबेहुब अदनान सारखा आहे.
5 / 9
अजान सामी खान हा पाकिस्तानचा मोठा अ‍ॅक्टर, सिंगर, प्रोड्यूसर व डायरेक्टर म्हणून ओळखला जातो. त्याने अनेक सुपरहिट गाणी प्रोड्यूस केली आहे.
6 / 9
अ‍ॅक्टिंगमध्येही त्याने नशीब आजमावलं. सजल अली व युमना जैदीसोबत त्याने ‘इश्क ए ला’मधून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता.
7 / 9
अजानने 2014 साली त्याची बालपणीची मैत्रिण सोफिया बिलगरामीसोबत लग्न केलं. दोघांना दोन मुली आहेत. अजान अनेकदा आपल्या मुलींसोबतचे फोटो शेअर करत असतो.
8 / 9
अदनान सामी माझे वडील आहेत, हे ऐकून आजही अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांनी स्वत:चे काही निर्णय घेतले आणि मी त्या निर्णयांचा आदर करतो, असं अजान एका मुलाखतीत म्हणाला होता.
9 / 9
आईने माझा सांभाळ केला. वडिलांसोबत माझं मित्रासारखं नातं आहे. आम्ही अनेकदा महिने महिने एकमेकांशी बोलत नाही. पण बोलतो तेव्हा अनेक तास गप्पा मारतो. मी त्यांचा खूप आदर करतो, असंही अजान म्हणाला होता.
टॅग्स :अदनान सामीबॉलिवूड