IN PICS : धडाक्यात सुरू झालेत पण कधीच प्रदर्शित झाले नाहीत बॉलिवूडचे हे 11 सिनेमे, कारण....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 08:00 IST
1 / 11१९९२ साली आमीर खान, रविना टंडन आणि नसीरुद्दीन शहा यांचा ‘टाइम मशीन’ हा चित्रपट तयार होत राहिला. शेखर कपूर दिग्दर्शित या सिनेमा अर्धा अधिक बनून तयार होता.पण आर्थिक अडचणी आल्या नि या चित्रपटास खीळ बसली. नंतर शेखर कपूर देखील हॉलिवूडमध्ये निघून गेला आणि हा चित्रपट अपूर्णच राहिला.2 / 11१९९३ साली अक्षय कुमार व दिव्या भारतीचा ‘परिणाम’ हा सिनेमा येणार होता. प्री-प्रॉडक्शनचं कामही जवळपास पूर्ण झालं होतं. पण याचवर्षी दिव्या भारतीने जगाचा निरोप घेतला आणि हा सिनेमाही डब्बाबंद झाला.3 / 11मुन्ना चले अमेरिका हा मुन्नाभाई सीरिजचा तिसरा सिनेमा पाहाण्यास प्रेक्षक आतूर होते. थोडफार शूटींगही झालं होतं. पण संजय दत्त तुरूंगात गेला आणि हा सिनेमा नेहमीसाठी गुंडाळला गेला.4 / 11सुभाष घई अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘देवा’ नावाचा सिनेमा बनवणार होते. शूटींगही सुरू झाले होते. पण अमिताभ व सुभाष घई यांच्यात काही कारणावरून मतभेद निर्माण झाले आणि हा सिनेमा थांबला तो थांबलाच.5 / 11रेखा व अमिताभ यांच्या ‘अपने पराए’ या सिनेमाचे शूटींगही सुरू झाले होते. पण मेकर्सनी आर्थिक अडचणींचे कारण देत हा सिनेमा बंद केला.6 / 11 पाँच हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट बनून पूर्ण झाला होता. के के मेनन, आदित्य श्रीवास्तव, विजय मौर्या, जॉय फर्नांडिस आणि तेजस्विनी कोल्हापुरे यात मुख्य भूमिकेत होते. पण मोठ्या प्रमाणात शिव्या आहेत म्हणून सेन्सॉर बोर्डाने मंजूरी दिली नाही आणि चित्रपट रखडला तो कायमचा7 / 11विनोद खन्ना, संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी असे आघाडीचे कलाकार घेऊन १९८८ साली ‘जमीन’ या चित्रपटाची सुरुवात झाली. रमेश सिप्पी या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. पण आर्थिक अडचणींपायी तो बंद पडला. 8 / 11दिग्दर्शक मनमोहन देसाई आणि महानायक अमिताभ बच्चन या जोडीने ‘सरफरोश’ नावाचा चित्रपट त्यांनी करायला घेतला. एका गुन्हेगाराची भूमिका अमिताभ बच्चन साकार करत होता. त्याची नायिका होती परवीन बाबी. पण हा चित्रपट अपूर्ण राहिला. पण हो, पुढे याच नावाचा एक चित्रपट आला. ज्यात आमीर खान नायक होता.9 / 11पूर्ण झाला पण पडदा गाठू शकला नाही असाच एक चित्रपट म्हणजे, ‘चोर मंडली’. त्यामध्ये राज सोबत अशोक कुमार होते. हिरे चोरण्याच्या मागावर असलेल्या दोन चोरांची ही मजेदार कहाणी होती. पण हा चित्रपट कधीच रिलीज झाला नाही.10 / 11‘लेडीज ओन्ली’ याचा हिरो होता रणधीर कपूर होता. बाईलवेड्या बॉसची भूमिका त्याने यात निभावली होती. हा चित्रपट १९९७ मध्ये तयार झाला. पण का कुणास ठाऊक रुपेरी पडद्यावर झळकू शकला नाही.11 / 11‘हम’ सारखा यशस्वी चित्रपट देणारे दिग्दर्शक मुकुल आनंद यांनी १९९६ मध्ये ‘दस’ नावाचा चित्रपट सुरू केला. सलमान खान व संजय दत्त चित्रपटाचे दोन हिरो होते. पण दिग्दर्शक मुकुल आनंद अचानक वारले आणि हा चित्रपट पुढे थांबला.