Join us  

एका MMSमुळे उद्धवस्त झालं करिअर, पर्सनल कारणांमुळेच जास्त चर्चेत राहिली 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 3:17 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल म्हणून रिया सेनची ख्याती आहे. आज ही अभिनेत्री तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. बालवयात अभिनयाचे धडे गिरवत रियाने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. मात्र, एका घटनेमुळे या अभिनेत्रीचं करियर धुळीस मिळालं.
2 / 7
बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन हे नाव फार कमी लोकांना माहित असेल. या अभिनेत्रीची फिल्मी कारकीर्द फारशी गाजली नाही. आज रियाने वयाच्या ४४ व्या वर्षात पदार्पण केलंय.
3 / 7
२४ जानेवारी १९८१ मध्ये पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात अभिनेत्री रिया सेनचा जन्म झाला. रीया सेन राजघराण्यातील आहे. तिचे वडील भरत देव वर्मा त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत. परंतु अभिनयाव्यतिरिक्त रिया सेन तिच्या वैयक्तिक कारणामुळे नेहमीच चर्चेत राहिली.
4 / 7
१९९८ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी फाल्गुनी पाठकच्या 'याद पिया की आने लगी' या म्युझिक व्हिडिओमध्ये रिया दिसली होती. त्यावेळी पहिल्यांदा मॉडेल म्हणून तिला ओळख मिळाली. मात्र सततच्या वादांमुळे अभिनेत्रीने बॉलिवूडला कायमचा रामराम केला.
5 / 7
अवघ्या ५ वर्षाची असताना रिया सेनने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. अभिनेत्रीने १९९१ मध्ये 'विषकन्या' या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. एका मोठ्या घटनेनंतर अभिनेत्रीचे करियर उद्ध्वस्त झाले. त्यामुळे तिने बॉलिवूडला कायमचा रामराम केला. तरीही अभिनेत्री इतर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे.
6 / 7
रीयाची आई मुनमुन सेन आणि आजी सुचित्रा सेन या देखील दिग्गज अभिनेत्री होत्या. हिंदी व्यतिरिक्त तिने बंगाली,इंग्रजी,तामिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. रिया ५ वर्षांची असताना त्यावेळी तिने पहिल्यांदा पडद्यावर लहान मुलीची भूमिका साकारली.
7 / 7
बॉलिवूड अभिनेता अश्मित पटेलसोबत रिया सेनच्या अफेअरच्या अनेक किस्से ऐकायला मिळतात. दोघांचा एक एमएमएसही लीक झाला होता. या घटनेनंतर रिया सेनचे करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.याशिवाय'रागिनी एमएमएस रिटर्न्स'च्या सेटवर तिच्या सहकलाकाराने अभिनेत्रीवर कपडे काढल्याचा आरोप केला होता.
टॅग्स :रिया सेनबॉलिवूड