Join us  

'ये आइना हैं या तू हैं...' कियाराच्या सौंदर्याला तोडच नाही, फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 4:02 PM

1 / 7
कियारा अडवाणी हे नाव हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर येतं. दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
2 / 7
'कबीर सिंग' या सिनेमामुळे अभिनेत्री कियारा अडवाणी रातोरात लोकप्रिय झाली. आपली उत्तम अभियनशैली आणि सौंदर्याच्या जोरावर तिने अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली.
3 / 7
अभिनेत्रीने २०१४ साली आलेल्या 'फुगली' या सिनेमातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. आपल्या सौंदर्याने आणि स्टाईलने बॉलिवूडवर राज्य करणारी ही सुंदर अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
4 / 7
कियारा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. त्या माध्यमातून अभिनेत्री आपल्या वैयक्तिक तसेच खासगी आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
5 / 7
कियाराने अलिकडेच एक फोटोशूट केलं आहे. आकाशी रंगाच्या हाय स्लिट ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये कियाराने केलेलं फोटोशूट चर्चेत आलं आहे.
6 / 7
हाय स्लिट ड्रेसमध्ये कियाराचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. या व्हायरल फोटोंमध्ये तिने आपल्या अदाकारीने चाहत्यांना वेड लावल्याचं पाहायला मिळत आहे.
7 / 7
आकाशी रंगाचा हाय स्लिट ड्रेस त्यावर साजेसा मेकअप करत कियाराने ग्लॅमरस लूक केला आहे. शिवाय सध्या इंटरनेटवर तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
टॅग्स :कियारा अडवाणीबॉलिवूडसेलिब्रिटी