Join us  

आमिर खान ते शाहिद कपूर! केवळ अभिनेत्रीच नव्हे तर 'या' अभिनेत्यांनीही केलीये प्लास्टिक सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 11:52 AM

1 / 13
बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा अभिनेत्री आणि त्यांनी केलेल्या सर्जरी यांचीच चर्चा रंगत असते. मात्र, इंडस्ट्रीमध्ये असे काही दिग्गज अभिनेता आहेत ज्यांनीही प्लास्टिक सर्जरी करुन त्यांच्या लूकमध्ये बदल केला आहे.
2 / 13
रणबीर कपूर - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. आज रणबीरच्या लूकचे असंख्य चाहते आहेत. परंतु, हा लूक मिळवण्यासाठी त्याने सर्जरी केली आहे.
3 / 13
रणबीरने त्याची हेअरलाइन व्यवस्थित करण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे.
4 / 13
शाहिद कपूर - शाहिद कपूरचा आज मोठा फिमेल फॅनफॉलोअर्स आहे. त्याच्या पर्सनालिटीची कायम तरुणींमध्ये चर्चा होत असते. परंतु, शाहिदने सुद्धा प्लास्टिक सर्जरी केली आहे.
5 / 13
काही वर्षांपूर्वी शाहिदने नोज जॉब सर्जरी केली आहे. या सर्जरीच्या मदतीने त्याने त्याचं नाव व्यवस्थित करुन घेतलं आहे.
6 / 13
राजकुमार राव - अभिनेता राजकुमार राव याला त्याच्या रंगरुपामुळे अनेकदा रिजेक्शनचा समाना करावा लागला. अनेकांनी त्याच्या भुवयांची खिल्ली उडवत त्याला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला होता.
7 / 13
राजकुमारने एका मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं. त्याने सर्जरीच्या माध्यमातून त्याच्या भुवयांना नवीन आकार दिल्याचं त्याने सांगितलं होतं.
8 / 13
सैफ अली खान- बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफ अली खान याने सुद्धा सर्जरीच्या माध्यमातून त्याच्या लूकमध्ये बदल केला आहे.
9 / 13
सैफने फेस लिफ्ट केलं आहे. इतकंच नाही तर त्याने बोटॉक्स ट्रिटमेंटही केल्याचं म्हटलं जातं.
10 / 13
सलमान खान- आज सलमानचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.त्यामुळे त्याच्यासारखं दिसण्यासाठी अनेक तरुण त्याची स्टाइल कॉपी करतात. परंतु, सलमानने सुद्धा त्याच्या लूकमध्ये बदल घडवण्यासाठी सर्जरीचा आधार घेतला आहे.
11 / 13
सलमानने हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे. इतकंच नाही तर त्याने बोटॉक्स आणि चीक फीलर्सही केल्याचं सांगण्यात येतं.
12 / 13
आमिर खान- बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शननिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर लूकच्या बाबतीत म्हणावा तितका परफेक्ट नाही. त्यामुळे त्यानेही सर्जरीचा आधार घेतला आहे.
13 / 13
आमिरने कॉस्मेटिक सर्जरीच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवल्या आहेत.
टॅग्स :बॉलिवूडसलमान खानशाहिद कपूरराजकुमार राव