Join us  

मोठी बहीण जान्हवी कपूरसारखीच स्टायलिश आहे खुशी कपूर, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 1:46 PM

सध्या बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त स्टार किड्सचाच बोलबाला आहे. जिथे पहावे तिथे स्टारकिड्सच्या चर्चा रंगत आहे. आज आम्ही श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरविषयी तुम्हाला सांगणार आहोत. जान्हवी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. आपल्या स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहणाºया जान्हवीचे जेव्हा-जेव्हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा-तेव्हा चाहत्यांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला. परंतु जान्हवीप्रमाणेच तिची लहान बहीण खुशी कपूरही स्टायलिश आहे. विश्वास बसत नसेल तर फोटो पहा!

सध्या बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त स्टार किड्सचाच बोलबाला आहे. जिथे पहावे तिथे स्टारकिड्सच्या चर्चा रंगत आहे. आज आम्ही श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरविषयी तुम्हाला सांगणार आहोत. जान्हवी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. आपल्या स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहणाºया जान्हवीचे जेव्हा-जेव्हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा-तेव्हा चाहत्यांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला. परंतु जान्हवीप्रमाणेच तिची लहान बहीण खुशी कपूरही स्टायलिश आहे. विश्वास बसत नसेल तर फोटो पहा!नुकतीच मुंबई विमानतळावर जान्हवी आणि तिची लहान बहीण खुशी स्पॉट झाली. यावेळी दोघींचाही अंदाज बघण्यासारखा होता.जान्हवीचा पांढºया रंगाचा फुल स्लीव बॉडीसूट आणि रेड पॅण्ट असा ड्रेसकोड होता. तर खुशी जिपर जॅकेटवर पांढºया रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या शूजमध्ये बघावयास मिळाली.खरं तर बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री असलेली श्रीदेवीदेखील आपल्या मुलींकडून नव्या फॅशनविषयी जाणून घेत असते.एका मुलाखतीत श्रीदेवीने म्हटले होते की, मी त्यांच्याकडून प्रेरणा घेत असते. ते मला याविषयी नेहमीच गाइड करीत असतात.जान्हवी लवकरच निर्माता तथा दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘सैराट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. हा चित्रपट मराठी ‘सैराट’चा रिमेक आहे.