Join us

बॉलिवूडमधील ‘बेफिक्रे’ जोडपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 19:42 IST

बॉलिवूड म्हटलं की बिनधास्तपणा, खुलेपणा आणि निडरपणा असेच काहीसे समीकरण आहे. बॉलिवूडमध्ये प्रेमातही पडतात आणि ब्रेकअपही तितक्याच वेगाने होते. ...

बॉलिवूड म्हटलं की बिनधास्तपणा, खुलेपणा आणि निडरपणा असेच काहीसे समीकरण आहे. बॉलिवूडमध्ये प्रेमातही पडतात आणि ब्रेकअपही तितक्याच वेगाने होते. असे असले तरी आपले प्रेम हे खुलेपणाने अगदी बेफिकिरीने दाखविण्याचा रिवाजही आहेच. अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यातील प्रेम तसं फारसं लपून राहत नाही. परंतु हे प्रेम लोकांसमोर व्यक्त करण्याचे धाडसही काही जोडपी करतात. अशाच बेधडक जोडप्यांची माहिती या ठिकाणी देत आहोत.सलमान-यूलिया वंतुरतसे म्हटले तर सलमानची अनेक प्रेमप्रकरणे झाली आणि मोडलीही गेली. सध्या सलमान खान आणि यूलिया वंतुर या जोडीचे प्रेमप्रकरण गाजतेय. हे दोघे लग्न करणार असल्याच्या वावड्या उठत असल्या तरी या दोघांचे लग्न केव्हा होणार हे सांगता येत नाही. बºयाच वेळा या दोघांना एकत्र पाहण्यात आलंय. बॉलिवूडमधील ही हॉट ‘बेफिक्रे’ कपल्स आहेत, म्हटले तर वावगं ठरणार नाही.सैफ अली खान-करिना कपूर-खानबेगम करिना गर्भवती झाल्यापासून सैफने तिची खूप काळजी घेतली आहे. बेबी बम्पसोबत करिनाचा हात धरत सैफ वारंवार तिला आपल्यासोबत ठेवतो आहे. सध्या सैफने घेतलेल्या करिनाच्या काळजीची बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. करिनाचा आणि सैफचा बर्थडे या दोघांनीही शानदारपणे साजरा केला. काही दिवसांपूर्वी ती सुटीला गेली होती, त्याही ठिकाणी हे जोडपे आनंदाने सुटी व्यतीत करताना दिसून आले.अनुष्का-विराट कोहलीअनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यादरम्यानही ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या. आता पुन्हा हे दोघे फिरताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी विराटच्या वाढदिवसाला अनुष्का आली होती. बॉलिवूडमध्ये सध्या ही जोडी लोकांचे आकर्षण बनली आहे. हे दोघेही एकमेकांसोबत अधिक वेळ असतात. त्यांची केमिस्ट्री आता अधिक जुळून आल्याचे वाटते आहे.अक्षय कुमार-ट्विंकल खन्नाबॉलिवूडमधील एक यशस्वी जोडपे म्हणून अक्षय कुमार आणि ट्ंिवकल खन्ना यांचे नाव गणले जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांचाही सुखी संसार सुरू आहे. अक्षय कुटुंबप्रेमी असल्याने ही जोडी सातत्याने एकमेकांसोबत फिरताना दिसते. संपूर्ण कुटुंबासमवेत अक्षय नेहमीच छायाचित्रांमधून दिसून येतो. अगदी मोकळ्या मनाचे जोडपे म्हणूनही या जोडीकडे पाहता येईल.रितेश-जेनेलियामराठमोळा रितेश देशमुख आणि त्याची ‘बायको’ जेनेलिया हे अगदी बिनधास्त जोडपे. एकमेकांना समजून घेणारे आणि सुखी संसार करणारी जोडी म्हणून रितेश-जेनेलियाकडे पाहिले जाते. या दोघांनीही आपले रोमँटिक फोटो शेअर केलेले आहेत. कोणत्याही कार्यक्रमात दोघेही एकत्र तुम्हाला दिसून येतील. अगदी हसतमुखाने सर्वांशी गप्पा मारणारी ही जोडी लोकप्रिय आहे.दीपिका-रणवीर सिंगकाही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना किस करणारी ही जोडी हल्ली फारशी एकत्र येताना दिसत नाही. त्यांच्यामध्ये दुरावा आला असल्याच्या बातम्या येत असल्या तरी ते बिनधास्त जोडपे म्हणूनच ओळखले जाते. हे दोघे संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार आहेत. शाहिद कपूर-मीरा राजपूतबॉलिवूडमधील हँडसम अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी लग्न केल्यानंतर त्यांना नुकतीच एक गोंडस मुलगी झालीय ‘मिशा’. शाहिदने मीरासोबत अगदी लग्नापासूनचे प्रत्येक फोटो सामाजिक माध्यमांतून शेअर केले आहेत. लग्नानंतर सुखी असणारे हे जोडपे म्हणूनच त्यांची ओळख आहे. आपल्या मुलीच्या जन्मापूर्वी आणि नंतरही शाहिदने मीराची खूप काळजी घेतली.बिपाशा बसू-करण सिंग ग्रोव्हरहॉट बिपाशा बसू आणि कूल करण सिंग लग्नानंतर सातत्याने एकमेकांसोबत फिरताना दिसतात. अगदी पार्टीतही या दोघांना हातात हात घालून फिरताना पाहण्यात आलेय. दोघेही अगदी मनमोकळेपणाने एकमेकांसोबत छायाचित्रे काढून घेताना दिसतात.