By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 17:22 IST
1 / 7 मुंबई ड्रग्स केस प्रकरणामध्ये मुंबईच्या एका विशेष न्यायालयाने गेल्या आठवड्यात आचित कुमार याला जामीन देताना व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारावर त्याने शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट यांना ड्रग्सचा पुरवठा केला होता, असे म्हणता येणार नाही, असे सांगितले.2 / 7कोर्टाने आपल्या विस्तृत आदेशामध्ये नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पंचनामा रेकॉर्डच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच हे पंचनामे काल्पनिक आणि संदिग्ध वाटत आहेत, असे सांगितले. 3 / 7नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सब्स्टेंस (एनडीपीएस) कायद्याशी संबंधांमध्ये त्याच्या सुनावणीसाठी विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी शनिवारी २२ वर्षीय कुमारला जामीन दिला होता. कोर्टाने आपल्या विसृत आदेशामध्ये सांगिले की, आर्यन खानसोबत व्हॉट्सअॅप चॅटशिवाय कुमार अशा प्रकारामध्ये सहभागी असल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. 4 / 7आदेशात सांगण्यात आले की, केवळ व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारावर आचित कुमार हा आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट यांना कंट्राबेंडचा पुरवठा करत होता, असे म्हणता येणार नाही. यातील आर्यन खानला उच्च न्यायालयाने जामीन दिल आहे.5 / 7३ ऑक्टोबर रोजी क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट यांना गुरुवारी मुंबई हायकोर्टाने जामीन दिला होता. दरम्यान, कोर्टाने सांगितले की, कुमारविरोधातील खटल्याला कुठल्याही इतर आरोपीसोबत जोडण्याचा काहीही पुरावा मिळालेला नाही. 6 / 7दरम्यान, कोर्टाने पंचनाम्यावरही शंका उपस्थित केली आहे. हा पंचनामा नंतर लिलिहा गेला होता. तो घटनास्थळावर तयार करण्यात आला नाही. त्यामुळे पंचनाम्यांतर्गत दाखवण्यात आलेल्या काही गोष्टी संदिग्ध आहेत. तसेच त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. दरम्यान, कोर्टाने आपल्या आदेशात सांगितले की, रेकॉर्डमध्ये असा कुठलाही पुरावा नाही आहे ज्यामधून कुमारने आरोपी क्रमांक एक आर्यन खान किंवा इतर कुणाला ड्रग्सचा पुरवठा केला होता, याचे पुरावे दिसत नाहीत. त्यामुळे अर्जदाराला जामिनावर मुक्त होण्याचा हक्क आहे. 7 / 7एनसीबीने कुमारच्या घरातून २.६ ग्रॅम गांजा जप्त केल्याचा दावा केला होता. ड्रग्स विरोधी एजन्सीच्या दाव्यानुसार कुमार हा आर्यन खान आणि मर्चंटला गांजा आणि चरसचा पुरवठा करत होता.