Join us  

मलायकापेक्षा बोल्ड आहे अरबाजची गर्लफ्रेंड; Giorgia चे बिकिनी फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 5:45 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. खासकरुन त्याच्या गर्लफ्रेंडमुळे जॉर्जियामुळे (Giorgia Andriani) तो चर्चेचा विषय ठरत आहे.
2 / 10
मलायका अरोरापासून कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर अरबाज त्याच्या आयुष्यात पुढे वळला असून तो एका इटालियन मॉडेल, अभिनेत्रीला डेट करत आहे.
3 / 10
अरबाजच्या गर्लफ्रेंडचं नाव जॉर्जिया एंड्रियानी असं असून ती जवळपास २२ वर्षांनी अरबाजपेक्षा लहान आहे. त्यामुळे जॉर्जियाचं वय ३० तर अरबाजचं ५२ असल्याचं सांगण्यात येतं.
4 / 10
मलायका- अर्जुनप्रमाणेच अरबाज आणि जॉर्जियाचं नातं आता कोणापासूनही लपलेलं नाही. अरबाजनेदेखील उघडपणे जॉर्जियाला डेट करत असल्याचं मान्य केलं आहे.
5 / 10
जॉर्जिया कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
6 / 10
अलिकडेच जॉर्जिया, अरबाजसोबत मालदीवला व्हेकेशन्ससाठी गेली आहे. येथील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
7 / 10
सौंदर्याच्या बाबतीत अनेकांवर मात करणारी जॉर्जिया तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. त्यामुळे अनेकदा तिची आणि मलायकाची सोशल मीडियावर तुलना होताना पाहायला मिळतं.
8 / 10
इटालियन अभिनेत्री असलेली जॉर्जिया सध्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे. अलिकडेच ती मिका सिंगच्या 'रुप तेरा मस्ताना'मध्ये झळकली होती.
9 / 10
जॉर्जिया लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहे. तिच्या या आगामी चित्रपटात ती अभिनेता श्रेयस तळपदेसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
10 / 10
जॉर्जिया 'कॅरोलिन अॅण्ड कामाक्षी' या वेबसीरिजमध्येही झळकली आहे. यात तिने एका इटालियन एजंटची भूमिका साकारली होती.
टॅग्स :अरबाज खानजॉर्जिया एंड्रियानीसेलिब्रिटीबॉलिवूड