Join us  

किरण आणि रिना व्यतिरिक्त ब्रिटिश महिलेसोबतही होते आमिर खानचे संबंध, दोघांना आहे एक मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 11:59 AM

1 / 9
घटस्फोटानंतर आता आमिर खानचे नाव बॉलीवूडची अभिनेत्री फातिमा सना शेखशीही जोडले जात आहे. फातिमा आमिर खानच्या 'दंगल' सिनेमात झळकली होती.
2 / 9
या सगळ्या चर्चांमध्ये आमिर खानची आणखी एक लव्ह स्टोरी समोर आली आहे ज्यात एका महिलेने दावा केला आहे की ती आमिर खानच्या मुलाची आई आहे आणि दोघे बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते.
3 / 9
यानंतर ती गरोदर राहिली आणि आमिर खानपासून तिला एक मुलगाही आहे.ब्रिटिश पत्रकार असलेल्या जेसिका हाइंसने आमिर खानसोबत असलेल्या नाते जगासमोर आणले होते.
4 / 9
मात्र आमिर खानने याला नकार देत बातमीचे खंडन केले होते. 2003 मध्ये जेसिकाने असा दावा केला होता की तिने ज्या मुलाला जन्म दिला आहे तो बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा आहे.
5 / 9
जेसिकाने आमिर खान आणि तिच्या नात्याबद्दल बर्‍याच गोष्टी उघड केल्या होत्या, दरम्यान तिने सांगितले की 'गुलाम' चित्रपटाच्या सेटवर ती आमिर खानला भेटली होती.
6 / 9
यादरम्यान, दोघांमधील जवळीक वाढली, मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले, दोघेही बरेच दिवस नात्यात होते.आमिर खानपासून ती प्रेग्नंट राहिल्याचे तिने सांगतिले होते.
7 / 9
आमिर खानच्या मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला होता.कोणत्याही महिलेशी त्याचा काही संबंध नाही. समोर येणा-या बातम्या सगळ्या खोट्या आहेत. निव्वळ अफवा आहेत. असे आमिर खानने स्पष्टीकरण दिले होते.
8 / 9
जेसिकाच्या मुलाचे नाव जान असून आता तो बराच मोठा झाला आहे. मॉडेलिंगही करतो. २०१२ मध्ये पहिल्यांदाच लंडन वोग मॅगिझिनच्या कव्हरपेजवर झळकला होता. त्यानंतर त्याने मॉडेलिंग करायला सुरुवात केली.
9 / 9
आमिर खानच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक अभिनेत्रींसह त्याचे नाव जोडले गेले होते. त्या अफेअरच्या जेवढ्या चर्चा रंगल्या नव्हत्या. तेवढ्या चर्चा ब्रिटिश महिलेसोबत असलेल्या अफेअरची चर्चा प्रचंड रंगली होती.
टॅग्स :आमिर खानकिरण राव