Join us  

अनुष्काने किंग कोहलीला दिल्या हटके शुभेच्छा, २०११ च्या 'त्या' रेकॉर्डचा फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 12:55 PM

1 / 10
भारतीय क्रिकेटमधील सध्याचा सर्वोत्तम फलंदाज 'रनमशिन' विराट कोहली (Virat Kohli) आज ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या सुरु असलेल्या विश्वचषकात विराटचा फॉर्म जबरदस्त आहे.
2 / 10
गेल्या काही काळापासून विराटचा करिअर ग्राफ खूपच सुधारला आहे. मधल्या काळात डाऊनफॉलला गेलेला विराट पु्न्हा वाऱ्याच्या गतीने पुढे आला आहे. किंग कोहलीचे चाहते आज जिथे तिथे त्याचा वाढदिवस साजरा करत आहेत.
3 / 10
विराटने नेहमी आपल्या या यशाचं श्रेय पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला (Anushka Sharma) दिलं आहे. तिच्या येण्याने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आयुष्य आणखी सुकर झालं असं तो नेहमी म्हणतो. विराटला लाडक्या पत्नीने हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
4 / 10
अनुष्काने विराटचे तीन अगदीच मजेशीर फोटो पोस्ट केलेत. पहिला फोटो जो २०११ च्या त्याच्या एका रेकॉर्डसंदर्भात आहे. यामध्ये तो आतापेक्षा खूपच वेगळा दिसतोय. या फोटोंना अनुष्काने खास कॅप्शन देत लिहिले,'त्याने आयुष्यातील प्रत्येक वळणावर नवनवीन रेकॉर्ड रचलेत. आजही त्याच्या मानाच्या तुऱ्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. माझं तुझ्यावरचं प्रेम या जीवनात आणि त्या पलीकडेही कायम राहील. कोणत्याही रुपात काहीही असो मी कायम प्रेम करत राहील.
5 / 10
अनुष्काने पोस्ट केलेला पहिलाच फोटो लक्षवेधी आहे. हा विराटचा २०११ साली T20 सामन्यात गोलंदाजी करतानाचा फोटो आहे. तेव्हा त्याने पहिल्यांदाच गोलंदाजी केली होती. तेव्हा त्याच्या नावावर एक आगळावेगळा रेकॉर्ड झाला होता. त्याने ० व्या बॉलवर इंग्लंडच्या केव्हिन पिटरसनला आऊट केले होते. कोहलीने वाईड बॉल टाकला आणि एम एस धोनीने स्टंप उडल्याने केव्हिन आऊट झाला होता.
6 / 10
तर दुसऱ्या फोटोतूनही अनुष्काने नेहमीप्रमाणेच विराटचा कधीही न पाहिलेला अंदाज दाखवला आहे. विराट आणि अनुष्का नेहमी एकमेकांच्या वाढदिवसाला मजेशीर फोटो पोस्ट करत हटके शुभेच्छा देत असतात.
7 / 10
तिसऱ्या फोटोत दोघांचा क्युट सेल्फी दिसत आहे. यामध्ये विराट स्माईल करत असून अनुष्का पाऊट करताना दिसत आहे. हा दोघांचा व्हॅकेशन दरम्यानचा फोटो आहे.
8 / 10
अनुष्काच्या या हटके पोस्टवर विराटने कमेंट केली आहे. डोक्याला हात लावलेला इमोजी आणि हार्ट इमोजी त्याने पोस्ट केला आहे. अशा प्रकारे दोघांचं प्रेम नेहमीच सोशल मीडियावर दिसून येतं.
9 / 10
अनुष्का आणि विराटला वामिका ही 2 वर्षांची मुलगी आहे. तर आता अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्याही चर्चा आहेत. यामुळे विरुष्काचे चाहतेही गोड बातमीची वाट पाहत आहेत.
10 / 10
आज विश्वचषक सामन्यात भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका सामना रंगणार आहे. वाढदिवसाच्या दिवशी विराटच्या शतकाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. यासोबतच विराट सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी करेल अशी आशा आहे.
टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीसोशल मीडिया