Join us  

PHOTOS: गणेशोत्सवात अंकिता लोखंडे दिसली मराठमोळ्या अंदाजात, तिचे साडीतील सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 1:51 PM

1 / 8
गणेश चतुर्थीच्या दिवशी अंकिता लोखंडे हिने पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले होते. या साडीसोबत तिने ग्रीन रंगाचा हाफ स्लीव्ज ब्लाउज परिधान केला होता.
2 / 8
या साडीवर तिने नाकात नथ घातली आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्याला चारचाँद लागले आहेत. 
3 / 8
त्यानंतर अंकिताने सिल्क साडीतील फोटो शेअर केले होते. यात तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती.
4 / 8
या साडीवर गोल्डन आणि सिल्वर धाग्यांनी वर्क करण्यात आले होते. या साडीतही अंकिता खूप सुंदर दिसत होती.
5 / 8
या साडीवर अंकिताने गोल्ड आणि मोत्यांचे इअररिंग्स आणि नथ घातली होती. गळ्यात हलका चोकर नेकलेस परिधान केला होता. साडीला मॅचिंग बांगड्या घातल्या होत्या.
6 / 8
लाल साडीनंतर अंकिताने पिंक रंगाची साडी नेसली होती. या साडीला गोल्डन रंगाची बॉर्डर होती आणि गोल्डन पोल्का डॉट्सही होते. या साडीवर अंकिताने गोल्डन रंगाचे झुमके घातले होते. या साडीत अंकिता खूपच सुंदर दिसत होती.
7 / 8
अंकिताच्या साडीतील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव केला. 
8 / 8
एकानंतर एक साडीतील लूकनंतर अंकिताने गणपती विसर्जना दिवशी पर्पल रंगाचा कुर्ता घातला होता. त्यावेळी तिचा लूक खूपच सिंपल ठेवला होता.
टॅग्स :अंकिता लोखंडेगणेशोत्सव