Join us  

लाइमलाइटपासून दूर राहते अनिल कपूरची छोटी मुलगी, मोठ्या बहिणीच्या आधीच करणार होती लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 11:39 AM

1 / 12
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची छोटी मुलगी आणि सोनम कपूरची बहिण रिया कपूर ३३ वर्षांची झाली आहे. रियाचा जन्म ५ मार्च, १९८७ साली मुंबईत झाला होता.
2 / 12
रिया बॉलिवूड इंडस्ट्रीत निर्माती म्हणून सक्रीय आहे.
3 / 12
रियाने २०१० साली मोठी बहिण सोनम कपूर व अभय देओलचा चित्रपट आयशाची निर्मिती केली होती.
4 / 12
याशिवाय तिने सोनम अभिनीत खुबसूरत आणि वीरे दी वेडिंगचीही निर्मिती केली आहे. रिया सोनमसारखी अभिनय क्षेत्रात नसल्यामुळे ती लाइमलाइटपासून दूर असते.
5 / 12
रिया निर्मातीसोबत एक फॅशन डिझायनरदेखील आहे. सोनम कपूरचे ड्रेस ती स्वतःच डिझाईन करते. तिचा फॅशन ब्रॅण्ड आहे रेहसन (Rheson).
6 / 12
रियाचा बॉयफ्रेंड करण चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने आयशा व वेकअप सिड यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
7 / 12
करणने कित्येक चित्रपट व शोजचे दिग्दर्शन, प्रोडक्शन व डबिंगचे काम केले आहे.
8 / 12
२०१३ साली वृत्त आले होते की रिया आणि करणचे लग्न सोनम कपूरच्या आधी होणार आहे.
9 / 12
करणची फॅमिली यानिमित्ताने कपूर फॅमिलीला भेटण्यासाठी दिल्लीतून मुंबईत आले होते
10 / 12
याशिवाय असेही वृत्त आले होते की डिसेंबर २०१३ साली त्यांचे लग्न फिक्स झाले आहे. मात्र काही कारणांमुळे ते झालं नाही.
11 / 12
रियापेक्षा आणखीन एक लहान भाऊ आहे. त्याचे नाव आहे हर्षवर्धन कपूर.
12 / 12
ज्याने मिर्झिया सिनेमातून करियरला सुरूवात केली.
टॅग्स :अनिल कपूरसोनम कपूर