1 / 9सुमारे दशकभरापासून अमिताभ बच्चन ब्लॉकवर लिहित आहेत. अमिताभ रोज न चुकता लिहितात आणि चाहते न चुकता वाचतात. पण अलीकडे वाचणाºयांची संख्या घटतेय आणि ट्रोलर्सची संख्या वाढतेय. कदाचित याचमुळे बिग बी हताश झाले आहेत.2 / 9त्यांच्या ताज्या ब्लॉगमधून त्यांची ही हताशा दिसतेय, आता तर त्यांना ब्लॉगमधून ब्रेक घ्यावासा वाटू लागलं आहे.3 / 9अमिताभ यांनी स्वत: ब्लॉगमध्ये ही गोष्ट बोलून दाखवली. लिहिणे थांबवावे किंवा अदृश्य होऊन जावे वाटतेय, असे त्यांनी लिहिलेय.4 / 9 गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगवर येणा-या कमेंटसची संख्या प्रकर्षाने घटलीये. हे पाहून अमिताभ व्यथित आहेत.5 / 9आधी माझ्या ब्लॉगवर रोज हजारो कमेंट्स यायच्या. पण आता तो आकडा 100 वर आला आहे. कदाचित लोकांची ब्लॉगमधील रूची कमी झाली आहे. कदाचित आता थांबण्याची वा इथून जाण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे.6 / 9गेल्या काही दिवसांपासून हेटर्समुळेही अमिताभ हताश आहेत. कोरोनाने मेलास तर बरा, अशी कमेंट इथपर्यंतची कमेंट्स गतवर्षी एका ट्रोलने केली होती. बच्चन या कमेंट्समुळे कमालीचे व्यथित झाले होते. संतापाच्या भरात त्यांनी कधी नव्हे ते हेटर्सला सुनावले होते़7 / 9कोरोना काळातील मदतीवरूनही अमिताभ यांना सतत ट्रोल केले जातेय. तुम्ही किती दान दिले, अशा प्रश्नांनी त्यांना उबग आणला आहे.8 / 9कालपरवा दानधर्मावरून ट्रोल करणा-यांना अमिताभ यांनी उत्तर देत, आपल्या दानधर्माची यादीच ब्लॉगवर शेअर केली होती.9 / 9मी दान देतो, पण त्याचा ढोल वाजवत नाही. मला गाजवाजा आवडत नाही, असे ते म्हणाले होते.