Join us  

In Pics : जितेन्द्र टॉयलेटमध्ये बसून पपई खातात तर अमिताभ..., या कलाकारांना आहेत विचित्र सवयी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 4:38 PM

1 / 11
अमिताभ बच्चन कधी कधी दोन घड्याळं घालतात. अमिताभ यांनी अशाप्रकारे दोन घड्याळं घालण्यामागे एक खास कारण असते. अमिताभ यांच्या कुटुंबियातील कोणताही सदस्य देशाच्या बाहेर गेला असेल तर ते दुसरे घड्याळ घालून त्या देशातील वेळाप्रमाणे ते सेट करतात. जेणेकरून त्या देशात सध्या वेळ काय आहे हे त्यांना कळते.
2 / 11
जितेंद्र हे बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते आहेत. जितेंद्र यांना चक्क टॉयलेटमधे बसून खाण्याची सवय आहे. खासकरुन ते टॉयलेटमध्ये बसून पपई खातात.
3 / 11
किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख सर्वत्र नेहमी सुटाबुटात दिसतो. आपल्यापैकी त्याची सिगारेट पिण्याची सवय सर्वाना माहिती असेल. पण त्याला अजून एक विचित्र सवय आहे. त्याला सुटाबुटात राहायची विचित्र सवय आहे. तो घरात देखील अनेकदा सुटाबुटात फिरतो.
4 / 11
अनेकांना आंघोळीचा कंटाळा येतो. आमिर खानही त्यातलाच. आमिरला आंघोळ करायला अजिबात आवडत नाही. आमिरची घटस्फोटित पत्नी किरण रावने खुद्द हा खुलासा केला होता.
5 / 11
आपल्यातील अनेकांना बसल्या बसल्या नखे खायची सवय असते. अशीच सवय बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरला आहेत. तिला अनेकवेळा नखे खाताना पाहाण्यात आलं आहे.
6 / 11
सुश्मिता सेनला एक खूपच विचित्र सवय आहे. या गोष्टीबद्दल तुम्ही कदाचितच कुठे वाचले असेल. सुष्मिता सेनला मोकळ्या जागेत अंघोळ करायची सवय आहे. तिला आकाशाकडे बघत अंघोळ करायला आवडतं. त्यासाठी तिने आपल्या घराच्या छतावर विशेष व्यवस्था यासाठी केलेली आहे. ती अनेकदा घराच्या छतावर अंघोळ करते.
7 / 11
बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाला साफसफाई आणि स्वछतेची अति सवय आहे. ती हॉटेलच्या खोलीत पोहोचते तेव्हा सर्वप्रथम बाथरूम बघते.
8 / 11
अभिनेता जॉन अब्राहमचे बाइकप्रेम सर्वश्रुत आहे. त्याला गाड्यांचा विशेष शौक आहे. पण जॉनला एक विचित्र सवय देखील आहे. ती म्हणजे जॉन हा सतत आपला पाय हलवत राहतो. हे आपल्यापैकी खूप कमी जणांना माहिती असेल. अनेकदा या सवयीमुळे त्याच्यावर शूटिंग थांबवण्याची वेळ आली आहे.
9 / 11
अभिनेता शाहिद कपूरला सतत कॉफी पिण्याची सवय आहे. त्याला जर फार वेळ कॉफी पासून दूर ठेवलं तर तो बेचैन होतो.
10 / 11
सनी लियोनीला सतत तिचे पाय धुण्याची सवय आहे. ती कामात कितीही व्यग्र असली तरी त्यातून वेळ काढून ती तिचे पाय धूते. तिची ही सवय तिच्या जवळच्या अनेक लोकांना माहीत आहे.
11 / 11
विद्या बालनची एक सवय ऐकल्यावर तुम्हाला थोडे विचित्र वाटेल. झोपताना सर्वजण सुटेबल नाईट सूट घालून झोपतात. पण विद्या बालन मात्र नाईट सुट ऐवजी साडीवरच झोपणे पसंत करते.
टॅग्स :बॉलिवूडअमिताभ बच्चनजितेंद्रकरिना कपूर