Join us  

SEE PICS : साऊथची ही बोल्ड बाला बनणार ‘परवीन बाबी’, येतेय नवी वेबसीरिज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 2:36 PM

1 / 6
दिग्दर्शक महेश भट यांची पहिली वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेबसीरिज 70 व्या दशकातील बोल्ड अभिनेत्री परवीन बाबीच्या जीवनावर आधारित आहे. अशात परवीन बाबीची भूमिका कोण साकारणार, हा प्रश्न पडणे निश्चित आहे. तर त्याचाही खुलासा झाला आहे. साऊथची बोल्ड अ‍ॅक्ट्रेस आमला पॉल ही भूमिका साकारणार आहे.
2 / 6
या वेबसीरिजचे नाव गुलदस्त्यात आहे. पण कथा 70 च्या दशकातील हिंदी सिनेमाभोवती गुंफली गेलेली आहे.
3 / 6
परवीन बाबी व महेश भट यांचे अफेअर एकेकाळी चर्चेत होते. अशात परवीनच्या आयुष्यावरच्या महेश भट यांच्या या प्रोजेक्टबद्दल कमालीची उत्सुकता आहे. परवीन बॉबीची भूमिका आमला कशी साकारते, हे पाहण्यासही चाहते उत्सुक आहेत.
4 / 6
आमलाने नुकतेच बाथटबमधील काही फोटो शेअर केले होते. न्यूड सीन्स दिल्याने वादाच्या भोव-यात सापडलेल्या आमलाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
5 / 6
2014 मध्ये आमला पॉलने दिग्दर्शक एएल विजयसोबत लग्न केले होते. पण आता दोघांचा घटस्फोट झाला आहे.
6 / 6
2009 मध्ये मल्याळम सिनेमा ‘नीलातामरा’ मधून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर अनेक तामिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटांत ती झळकली.
टॅग्स :अमला पॉलपरवीन बाबीमहेश भट