Join us  

'शैतान'च्या ट्रेलरमधून अजय देवगणच्या ऑनस्क्रीन लेकीने वेधलं लक्ष, कोण आहे ही अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 2:08 PM

1 / 8
अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका यांचा आगामी 'शैतान' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहून प्रत्येकाचीच प्रतिक्रिया 'खतरनाक' अशीच आली असणार असा हा जबरदस्त ट्रेलर आहे. शैतान हा एक हॉरर थ्रिलर सिनेमा असणार आहे.
2 / 8
गुजराती चित्रपट 'वश' चा 'शैतान'हा हिंदी रिमेक आहे. क्रिश्नदेव याज्ञिक यांनी गुजराती सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. एक सामान्य कुटुंब व्हॅकेशनसाठी एका गावात जाऊन राहतं. तिथे एक अज्ञात माणूस येऊन त्यांच्या मुलीवर काळी जादू करतो. यादरम्यान कशा भयानक आणि विचित्र घटना घडतात हे सिनेमात दिसणार आहे.
3 / 8
ट्रेलरमध्ये अजय देवगणच्या मुलीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीने लक्ष वेधून घेतलंय. शैतानने घरात घुसून तिलाच वश केल्याने ती कोणकोणत्या प्रकारे स्वत:ला आणि कुटुंबाला त्रास देते याचं खतरनाक चित्रीकरण सिनेमात केलं आहे.
4 / 8
अजय देवगणच्या मुलीच्या भूमिकेत आहे २८ वर्षीय गुजराती अभिनेत्री जानकी बोडिवाला(Janki Bodiwala). विशेष म्हणजे ओरिजनल गुजराती सिनेमातही जानकीचीच भूमिका आहे. ती गुजराती सिनेमांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
5 / 8
'वश'हा जानकीचा तिसरा गुजराती सिनेमा होता. तिने 'छेल्लो दिवस' सिनेमातून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. क्रिश्नकांत याज्ञिक यांनीच याही सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. जानकीने तंबुरो, छुट्टी जशे छक्का' आणि 'बौ ना विचार' या सिनेमांमध्येही काम केलं आहे.
6 / 8
'वश' मधील जानकीचा दमदार अभिनय पाहून सर्वच प्रभावित झाले होते. अजय देवगणही तिच्या अभिनयाने इतका प्रभावित झाला की त्याने सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्येही तिलाच कास्ट केले.
7 / 8
जानकी अहमदाबादमध्येच लहानाची मोठी झाली आहे. तिथेच तिने डेंटल सायन्समध्ये शिक्षणही घेतलंय.जानकीने मिस इंडिया 2019 मध्ये सहभाग घेतला होता ज्यात तिने टॉप 3 पर्यंत मजल मारली होती.
8 / 8
जानकी बोडीवालाची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे. तिचे इन्स्टाग्रामवर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. खूप कमी वयात तिने तुफान यश मिळवलंय.
टॅग्स :सिनेमाअजय देवगणआर.माधवन