ऐश्वर्या राय बच्चनचा गॉर्जिअस लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST
ऐश्वर्या राय बच्चनने 1994 साली मिस वर्ल्डची किताब जिंकत संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. ऐश बॉलिवूडमधल्या पॉप्युलर सेलिब्रेटींन पैकी एक आहे. तिला 2 वेळा तिच्या अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.
ऐश्वर्या राय बच्चनचा गॉर्जिअस लूक
ऐश्वर्या राय बच्चनने 1994 साली मिस वर्ल्डची किताब जिंकत संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. ऐश बॉलिवूडमधल्या पॉप्युलर सेलिब्रेटींन पैकी एक आहे. तिला 2 वेळा तिच्या अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. 2009 मध्ये तिला पद्मश्री पुरस्कराने तर 2012 मध्ये फ्रान्स सरकारकडून औरड्रे डेस आर्टस एट डेस लेट्रेसने गौरविण्यात आले आहे. ऐश्वर्याने आपल्या करिअरची सुरुवात तमिळ चित्रपट 'इरुवर'मधून केली. 2007मध्ये ती अभिषेक बच्चनसोबत विवाह बंधनात अडकली. आई झाल्यानंतर तिने बॉलिवूडमधून काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर रणबीर कपूरसोबत तिने ऐ- दिल है मुश्किल चित्रपटातून कमबँक केला.