Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या राय बनली बॉलिवूडची दुसरी सर्वात श्रीमंत अभिनेत्री, प्रॉपर्टीचा आकडा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 19:41 IST

1 / 8
ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोक तिचे चाहते आहेत. तिच्या यशस्वी अभिनय कारकिर्दीमुळे ऐश्वर्या एक आलिशान जीवन जगते.
2 / 8
ऐश्वर्याने तिच्या मेहनतीच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये दिसली नाही पण तिची एकूण संपत्ती खूप जास्त आहे. संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल.
3 / 8
ऐश्वर्या राय एकूण संपत्तीच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींना मागे टाकले आहे. ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, ऐश्वर्या एका चित्रपटासाठी १० कोटी रुपये घेते. तसेच, ती ब्रँड प्रमोशनसाठी ६-७ कोटी रुपये घेते.
4 / 8
सियासत डॉट कॉमच्या रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या राय भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत अभिनेत्री बनली आहे. तिची एकूण संपत्ती ९०० कोटी आहे.
5 / 8
अभिनय आणि ब्रँड एंडोर्समेंटसोबतच, ऐश्वर्या व्यवसायाच्या जगातही उतरली आहे. तिच्या गुंतवणुकीमुळे ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व्यावसायिक महिला आहे.
6 / 8
रिअल इस्टेटचा विचार केला तर ऐश्वर्याने अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ती वांद्रे येथे ५० कोटींच्या एका मोठ्या बंगल्यात राहते. याशिवाय दुबईमध्ये तिचा एक व्हिलादेखील आहे.
7 / 8
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ऐश्वर्या राय बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. ती शेवटची २०२३ मध्ये आलेल्या पीएस २ चित्रपटात दिसली होती. तेव्हापासून तिने तिच्या कोणत्याही प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.
8 / 8
मुलगी आराध्याच्या जन्मापासून ऐश्वर्या अभिनयापासून दूर आहे. ती तिचा सर्व वेळ आराध्याच्या संगोपनात घालवते आहे. आराध्या देखील तिच्या आईची कॉपी दिसते.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन