Join us

लग्नाआधीच आई होणाºया अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 11:58 IST

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही प्रेग्नेंट असल्याने सर्वत्रच सध्या  तिचीच चर्चा आहे. तसे आई होणे हे  प्रत्येक स्त्रीचे लग्नानंतरचे ...

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही प्रेग्नेंट असल्याने सर्वत्रच सध्या  तिचीच चर्चा आहे. तसे आई होणे हे  प्रत्येक स्त्रीचे लग्नानंतरचे स्वप्न असते, परंतु, बॉलीवूडच्या काही अशा अभिनेत्री आहेत. की, त्या लग्नापूर्वीच आई झालेल्या आहेत. काहीजणींनी तर अगोदर बाळाला जन्म दिला व त्यानंतर लग्न केले. कोण आहेत या अभिनेत्री त्याची ही खास माहिती.नीना गुप्ता :नीना गुप्ता ही बॉलिवूड व टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या अनेक निर्णयामुळे तिची आज वेगळी ओळख आहे. तिचे प्रसिद्ध क्रिकेटपटू विवियन रिचर्डस सोबत प्रेमप्रकरण सुरु होते. तिने  लग्नाच्या अगोदरच आई बनण्याचा निर्णय घेऊन, १९८९ मध्ये मसाबा या मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर रिचर्डस सोबत तिने लग्न केले. श्रीदेवी : अभिनेत्री श्रीदेवी सुद्धा लग्नाच्या अगोदर प्रेग्नेट होती. तिने १९९६ जेव्हा बोनी कपूरसोबत लग्न केले. तेव्हा ती सात महिन्याची प्रेग्नेंट होती.  त्यानंतर काही दिवसातच तिने मुलीला जन्म दिला होता. तसेच लग्नाअगोदर प्रेग्नेंट असल्याने तिने जाहीरपणे सांगितले सुद्धा होते. कोकणा सेन : कोकणा सेनने सुद्धा आपला बॉयफ्रेंड रणवीर शौरी सोबत २०१० मध्ये एका समारंभात लग्न केले होते. परतु, ती  अगोदरच  प्रेग्नेंट असल्याने लग्नानंतर काही महिन्यातच तिने मुलाला जन्म दिला होता. सारिका : दक्षिणचा सुपरस्टार कमल हसन सोबत अभिनेत्री सारिका हिचे अफेअर सुरु होते. कमल हसनने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तो  सारिकासोबत राहायला लागला. याचदरम्यान सारिका प्रेग्नेंट असल्याची बातमी आली होती. १९८६ मध्ये सारिकाने श्रृती या मुलीस जन्म देऊन १९८८ मध्ये त्या दोघांनी लग्न केले. अमृता अरोरा :अमृता अरोरा हिने २००९ मध्ये बिजनेसमन शकील सोबत लग्न केले होते. ती सुद्धा लग्नाच्या अगोदरच प्रेग्नेंट होती. लग्नानंतर लगेचच तिने आई बनत असल्याची सांगितले होते.