Join us  

लग्नाला जात असताना अभिनेता वरुण धवनच्या कारला अपघात; सारे सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 10:07 AM

1 / 10
बॉलीवुडचा अभिनेता वरुण धवन त्याची बालमैत्रिण फॅशन डिझायनर नताशा दलाल हे आज लग्नबेडीत अडकणार आहेत. अलिबाग तालुक्यातील सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे हा विवाह समारंभ कुटुंबीय आणि काही मोजक्याच मित्रमंडळींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. शनिवारी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला.
2 / 10
मात्र या लग्नासाठी अलिबागला जात असताना वरुणच्या कारला अपघात झाला. यामध्ये वरुणसोबत त्याचे मित्र होते. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
3 / 10
वरुण धवनच्या लग्नाची तयारी जोरात सुरु होती. नेटकऱ्यांमध्येही वरुणच्या लग्नाची खूप क्रेझ दिसून येत आहे.
4 / 10
वरुणच्या कारचा हा अपघात छोटा होता. कारला काही प्रमाणात डेंट आला आहे. मुंबईतून अलिबागला जात असताना हा अपघात झाला.
5 / 10
वरुणला अलिबागला जाताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यामुळे त्यांना साखरपुड्याला पोहोचण्यासाठी उशिर होत होता.
6 / 10
लवकर पोहोचण्यासाठी घाई केल्याने या घाईगडबडीत हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
7 / 10
अलिबागला पोहोचल्यावर वरुणचे कारमधून उतरतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. वरुणचे कुटुंबीय शुक्रवारीच पोहोचले होते.
8 / 10
सहावीमध्ये असताना वरुण आणि नताशाची पहिली भेट झाली होती. अकरावी-बारावीपर्यंत ते चांगले मित्र होते. नंतर ही मैत्री प्रेमात रुपांतरीत झाली. गतवर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला होता.
9 / 10
अत्यंत साध्या आणि मोजक्याच जवळच्या मित्रपरिवार आणि कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत हे जोडपे नव्या आयुष्यात पाऊल ठेवणार आहे.
10 / 10
‘डेस्टिनेशन वेडींग’साठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. सेलेब्रिटी विवाहादरम्यान कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये, शांतता-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी मांडवा सागरी पोलीस सतर्क आहेत, अशी माहिती मांडवा सागरी पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी सांगितले.
टॅग्स :वरूण धवनअलिबागकारअपघात