Join us

भूमिकेसाठी कलाकार झाले वजनदार

By admin | Updated: October 28, 2016 04:23 IST

नेहमी फिट राहणारे हे कलाकार जर आपल्याला वजन वाढवलेले दिसले तर आश्चर्य वाटेल ना? पण असे कितीतरी कलाकार आहेत, ज्यांनी केवळ भूमिकेसाठी वजन वाढवले आहे.

- Priyanka Londhe

नेहमी फिट राहणारे हे कलाकार जर आपल्याला वजन वाढवलेले दिसले तर आश्चर्य वाटेल ना? पण असे कितीतरी कलाकार आहेत, ज्यांनी केवळ भूमिकेसाठी वजन वाढवले आहे. सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या दोन अभिनेत्रींनीदेखील आगामी सिनेमा वजनदारसाठी बरेच वजन वाढवले आहे. अशाच काही वजनदार कलाकारांवर एक नजर टाकू यात...आमिर खान (दंगल)आमिर खान नेहमीच चित्रपटांमध्ये वेगळे प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. आमिरच्या प्रत्येक चित्रपटात आपल्याला त्याचा वेगळा अंदाज दिसतो. आगामी चित्रपट 'दंगल'साठी आमिरने चक्क २२ किलो वजन वाढवले आहे. आमिर ६८ किलोवरून थेट ९० किलोवर जाऊन पोहोचला आहे. यासाठी त्याने आहारात बरेच बदल केले होते. मिस्टर परफेक्शनिस्ट ही पदवी आमिरला उगाचच मिळाली नाही हेच खरे.आर. माधवन (साला खडूस) :‘रहेना है तेरे दिल में’ या चित्रपटातील आर. माधवनच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंत केले होते. या चित्रपटानंतर माधवन फारसा काही बॉक्स आॉफिसवर कमाल करू शकला नाही. आर. माधवननेही नुकत्याच येऊन गेलेल्या त्याचा साला खडूस या चित्रपटासाठी बरेच वजन वाढवले होते. या चित्रपटातील माधवनच्या भूमिकेचे विशेष कौतुकदेखील करण्यात आले होते. विद्या बालन (डर्टी पिक्चर) : विद्या बालनने डर्टी पिक्चर या सिनेमासाठी जवळपास १२ किलो वजन वाढवलेले होते. हा सिनेमा विद्याने वाढवलेल्या वजनामुळे आणि तिच्या या चित्रपटातील एकंदरीतच लुकमुळे चर्चेत आला होता. सिल्क स्मिताच्या भूमिकेसाठी विद्याने घेतलेली मेहनत यशस्वी झाली होती. तिच्या या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुकसुद्धा केले होते. रणबीर कपूर (संजय दत्त बायोपिक) :संजय दत्तच्या जीवनावर चित्रपट येणार असल्याची जोरदार चर्चा सिनेइंडस्ट्रीत सध्या सुरू आहे. या चित्रपटामध्ये संजूबाबाची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. या चित्रपटासाठी रणबीर वजन वाढवणार असल्याचेही बोलले जाते आहे. आता संजय दत्तचा रोल करायचा म्हणजे संजूबाबासारखे दिसायला नको का? म्हणूनच रणबीर या भूमिकेला न्याय देण्यासाठी वजन वाढवणार असल्याचे समजतेय.