Join us

4640_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 15:12 IST

झोपेतून उठल्यापासून परत झोपेपर्यंत आपण अनेक गॅजेट्सचा वापर करीत असतो. सातत्याने याचा वापर करीत असल्याने आपल्या ते लक्षातही येत नाही. अगदी आपण झोपलो असलो तरी गॅजेट काम करीतच असते. सकाळी लवकर उठण्यासाठी लावण्यात आलेला गजर हे याचे चांगले उदाहरण आहे. शास्त्राची जसजशी प्रगती होत गेली, तसतशी जुन्या गॅजेट्सची जागा नव्याने घेतली. काही जुने झालेले गॅजेट्सही आजही वापरले जातात. त्याची या ठिकाणी माहिती देत आहोत.

झोपेतून उठल्यापासून परत झोपेपर्यंत आपण अनेक गॅजेट्सचा वापर करीत असतो. सातत्याने याचा वापर करीत असल्याने आपल्या ते लक्षातही येत नाही. अगदी आपण झोपलो असलो तरी गॅजेट काम करीतच असते. सकाळी लवकर उठण्यासाठी लावण्यात आलेला गजर हे याचे चांगले उदाहरण आहे. शास्त्राची जसजशी प्रगती होत गेली, तसतशी जुन्या गॅजेट्सची जागा नव्याने घेतली. काही जुने झालेले गॅजेट्सही आजही वापरले जातात. त्याची या ठिकाणी माहिती देत आहोत.सध्या सर्वच स्मार्टफोन्समध्ये जीपीएस तंत्रज्ञान आहे. काही लोक इन-डॅश जीपीएस अथवा पोर्टेबल डिव्हाईस वापरतात. उदाहरणार्थ वळणावर जर चालकाला फोन आला तर त्याला कळण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. त्याशिवाय सर्वांनीच रस्ते दाखविण्याची सोय केली आहे.आपण गाणी ऐकण्यासाठी सीडी, डीव्हीडी आणि इतर साधनांचा वापर करतो. मोठ्या काळ्या तबकड्यांचा म्हणजे व्हिनाईल एलपीजचा फारसा वापर केला जात नाही. तरीही बाजारात या दिसून येतात. जे संगीतप्रेमी आहेत, त्यांना या एलपीजवरील गाणी ऐकणे आवडते. ग्रामोफोन अजूनही उपलब्ध आहेत. एलपीजचे डिजीटल फाईल्समध्ये रुपांतर केले तरीही त्याला मरण नाही.सध्याच्या संगणकाचा की-बोर्ड आणि प्रिंटर यांचे एकीकरण म्हणजे जुन्या काळचा टाईपरायटर होय. यामध्ये आपल्याला जे हवे आहे ते थेट प्रिंट करता येऊ शकते. ब्रदर यांनी यामध्ये अनेक नवे प्रकार बाजारात आणले आहेत, जे विजेवर चालतात. यामध्ये संपादन अथवा पुनर्निमिती करता येत नसली तरी हे अद्यापही वापरात आहेत.प्रत्येकजण आपला मोबाईलफोन पोर्टेबल मिडीया प्लेअर म्हणून वापरत आहे. मग अशा पोर्टेबल मिडीया प्लेअरची वेगळी काय गरज आहे. काही मिडीया प्लेअर टी. व्ही. किंवा इतर उपकरणांना लावता येतात. यामुळे फोनची बॅटरी सेव्ह होते.लोकांकडे आलेला फोन घेणे किंवा तो नाकारण्याचे सेलफोनमुळे स्वातंत्र्य आले आहे. तरीही लँडलाईन फोनची अद्याप गरज आहे. मोबाईल फोन सगळीकडे वापरता येत नाही, विशेषत: मोठ्या इमारतींमध्ये. त्याशिवाय एक कायमस्वरुपी नंबरही यामुळे राहतो.ज्यावेळी लँडलाईन फोन आता मागे पडलेले असताना अ‍ॅन्सरिंग मशीन किंवा उत्तर देणाºया मशीनचा काही अर्थ उरत नाही. सध्या नव्या सेलफोनमध्ये व्हॉईसमेलची सोय आलेली आहे. दोघांचा उद्देश सारखाच आहे. ज्यावेळी व्यक्ती उत्तर देत नसेल किंवा त्या ठिकाणी नसेल, तो ज्यावेळी परत येईल त्याच्यासाठी हा मेसेज वाचता येऊ शकेल.हातातील अथवा भिंतीवरील घड्याळांची जागा आता मोबाईल फोनने घेतली आहे. वेळ दाखविणे, गजर करणे अशी कामेही हे फोन करतात. मात्र भिंतीवरील घड्याळांची सर या मोबाईल फोनमधील घड्याळांना येत नाही. प्रत्येक सेकंदाची टिकटिक यात अनुभवता येत नाही.