3870_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 06:30 IST
मद्यसम्राट आणि ‘किंग आॅफ गुड टाईम्स’ विजय माल्यांनी जगभरातील काही सर्वात महाग आणि आलिशान घरे विकत घेतलेली आहेत. त्यांपैकी पुढील काही प्रमुख घरे.
3870_article
मद्यसम्राट आणि ‘किंग आॅफ गुड टाईम्स’ विजय माल्यांनी जगभरातील काही सर्वात महाग आणि आलिशान घरे विकत घेतलेली आहेत. त्यांपैकी पुढील काही प्रमुख घरे.स्कॉटलँडमधील पर्थशायर भागातील केलोर कॅसल माल्यांनी 2007मध्ये खरेदी केला होता. स्कॉटिश मद्य कंपनीची मालकी ताब्यात घेताना त्यांनी हा कॅसल आपल्या मालकीचा केला. अलिकडेच माल्यांनी इंग्लंडमधील हर्टफोडशायर भागात एक घर खरेदी केले. वेविन गार्डन सिटी पासून जवळच टेविन गावात ते आहे. दक्षिण आफ्रिकेतील सर्वोत्कृष्ट गेम रेंज (शिकार) म्हणजे माबुला गेम लॉज. 25 हजार एकरवर पसरलेलीी ही प्रॉपर्टी माल्यांनी नव्वदच्या दशकात साठ लाख डॉलर्समध्ये खरेदी केली होती. ले ग्रँडे जार्डिन म्हणजेच भव्य दिव्य बगीचा. रशियन अब्जाधीश आणि हॉलिवूड सेलिब्रेटींना मागे सोडून माल्यांनी फ्रान्समधील सेंट मार्गारिट बेटावरील हे घर विकत घेतले होते. सुमारे 5.5 कोटी डॉलर्स एवढी या प्रॉपर्टीची किंमत आहे. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीच्या टम्प प्लाझा या न्यूयॉकमधील सर्वाध महागड्या रहिवासी इमारतीमधील पेंटहाऊस माल्यांनी 2४ लाख डॉलर्समध्ये खरेदी केले होते. या प्लाझामध्ये ब्रुस विलिस, बेयॉन्से यांसारख्या सेलिबे्रटींची घरे आहेत. 2010 साली त्यांनी 84 लाख डॉलर्स मोजून केप टाऊन शहरातील सर्वात सुंदर घर खरेदी केले होते. सॉना, जिमसह अनेक अद्यावत सुविधा असणाºया या घरात फिल्मकलाकार, पॉपस्टार्स, खेळाडू आणि राजघराण्याच्या लोकांनी मुक्काम केलेला आहे. 1987 साली माल्यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिको शहरातील सर्वात आलिशान घरापैकी एक घर विकत घेतले होते. घरातून बेलवेडेरे ते बे ब्रिजपर्यंतचा नयनरम्य व्यूव दिसतो. 11 हजार चौरस फुट क्षेत्रफळाच्या या घराला माल्यांनी 12 लाख डॉलर्समध्ये (सुमारे 7.5 कोटी रु.) खरेदी केले होते.