Join us

3866_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 04:42 IST

बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस समीरा रेड्डी हिचे कन्यादान विजय मल्ल्या यांनी केले आहे. यावरून मल्ल्या आणि बॉलीवुड यांच्यातील कनेक्शनचा अंदाज घेता येऊ शकतो. बॅँकांमधील तब्बल ७,८०० कोटी रूपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी विदेशात पलायन केलेले मल्ल्या सध्या चर्चेत आहेत. मल्ल्यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे वडिल विठ्ठल मल्ल्या देशातील प्रसिद्ध व्यापारी होते. व्यापाराबरोबर त्यांचे बॉलीवुड कनेक्शन कधीच लपून राहिले नाही. याबाबतच घेतलेला हा आढावा...

बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस समीरा रेड्डी हिचे कन्यादान विजय मल्ल्या यांनी केले आहे. यावरून मल्ल्या आणि बॉलीवुड यांच्यातील कनेक्शनचा अंदाज घेता येऊ शकतो. बॅँकांमधील तब्बल ७,८०० कोटी रूपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी विदेशात पलायन केलेले मल्ल्या सध्या चर्चेत आहेत. मल्ल्यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे वडिल विठ्ठल मल्ल्या देशातील प्रसिद्ध व्यापारी होते. व्यापाराबरोबर त्यांचे बॉलीवुड कनेक्शन कधीच लपून राहिले नाही. याबाबतच घेतलेला हा आढावा...विजय माल्या यांचे दोनदा लग्न झाले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव समीरा मल्ल्या असे आहे. समीरा या एयर इंडियामध्ये एयर हेस्टेस म्हणून काम करीत होत्या. समीरापासून सिद्धार्थ नावाचा विजय मल्ल्या यांना मुलगा आहे.अभिनेत्री समीरा रेड्डी हिच्या लग्नाच्या वेळी विजय मल्ल्या यांनीच पुढाकार घेवून तिचे कन्यादान केले. समीरा विजय मल्ल्यांना अंकल म्हणते.विजय माल्या यांचे अनेक बॉलीवुड स्टार्सशी घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे बॉलीवुड पार्ट्यांमध्ये ते नेहमीच झळकत असतात.विजय मल्ल्यांचा बिझनेस हॅँडल करणाºया सिद्धार्थचे नाव अनेक अभिनेत्री जोडले गेले. त्यामध्ये दीपिका पादुकोण, कॅटरिना कैफ, प्रसिद्ध गोल्फ आणि मॉडल र्मिला निकोलेट, सोफी चौधरी, फ्रीडा पिंटो यांचा समावेश आहे.अभिनेता सलमान खान, शाहरूख खान यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांशी विजय मल्ल्या यांचे व्यक्तिगत संबंध आहेत. शिवाय ते आयपीएल संघाचे मालक असल्याने त्यांचा बॉलीवुडशी आणखी घणिष्ट संबंध निर्माण झाला आहे.