Join us

3829_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 07:20 IST

अनिल कपूरचा मुलगा आणि अभिनेत्री सोनम कपूरचा धाकटा भाऊ हर्षवर्धन कपूर लवकरच बी टाउनमध्ये एण्ट्री करणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झीया’ या चित्रपटात तो झळकणार आहे. हर्षवर्धनने लॉस एंजेलिसमधून सिनेमॅटोग्राफी आणि स्क्रीनप्लेचा अभ्यास पूर्ण केला आहे आणि आता तो बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहेत. हर्षवर्धनसुद्धा वडील अनिल कपूर आणि बहीण सोनमप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीत आपले नाव रोशन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. याआधीही अनेक भाऊ-बहीण चित्रपटांत आले आहेत; परंतु यातील काही हिट तर काही फ्लॉप झाले आहेत. त्यांच्या बॉलिवूड प्रवासावर एक नजर...

अनिल कपूरचा मुलगा आणि अभिनेत्री सोनम कपूरचा धाकटा भाऊ हर्षवर्धन कपूर लवकरच बी टाउनमध्ये एण्ट्री करणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झीया’ या चित्रपटात तो झळकणार आहे. हर्षवर्धनने लॉस एंजेलिसमधून सिनेमॅटोग्राफी आणि स्क्रीनप्लेचा अभ्यास पूर्ण केला आहे आणि आता तो बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहेत. हर्षवर्धनसुद्धा वडील अनिल कपूर आणि बहीण सोनमप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीत आपले नाव रोशन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. याआधीही अनेक भाऊ-बहीण चित्रपटांत आले आहेत; परंतु यातील काही हिट तर काही फ्लॉप झाले आहेत. त्यांच्या बॉलिवूड प्रवासावर एक नजर...आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. पुढे सिद्धांत ‘शूट आउट अ‍ॅट वडाला’ या चित्रपटात बघावयास मिळाला. चित्रपट बॉक्स आॅफिसवर गल्ला जमविण्यात यशस्वी ठरला. मात्र सिद्धांतला करिअर स्थिर करता आले नाही. आजही सिद्धांत बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करीत आहे.सोनाक्षी आणि तिचा भाऊ लव सिन्हा यांनी २०१० मध्ये एकत्रच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. एकीकडे सोनाक्षीचा ‘दबंग’ हा चित्रपट सुपरडूपर हिट ठरला तर दुसरीकडे लवचा ‘सदिया’ हा चित्रपट सपाटून पडला. सोनाक्षीची तुलना आज बॉलिवूडमधील टॉप अ‍ॅक्ट्रेसेसमध्ये केली जाते. तर लव सध्या चित्रपटांपासून चार हात लांबच आहे.मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाºया आमीर खानला त्याचा भाऊ फैजल खान याचे करिअर सेट करण्यात मात्र सपशेल अपयश आले. ‘मेला’ (२०००) आणि ‘चिनार दास्ताने इश्क’ (२०१५) यासारख्या चित्रपटात काम केलेल्या फैजलला मोठे यश मिळालेच नाही. पुढे त्याने दोनवेळा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. आमीर मात्र कायम यशाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान राहिला.दोन दशकाहून सैफ अली खान बालिवूडमध्ये अ‍ॅक्टिव आहे; मात्र त्याची लहान बहीण सोहा स्वत:ची ओळख निर्माण करण्यास फारसी यशस्वी ठरली नाही. ‘रंग दे बसंती’ यासारख्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटात संधी मिळूनदेखील तिला याचा लाभ घेता आला नाही. कुणाल खेमू याच्याशी लग्न केल्यानंतर सोहा बॉलिवूडमधून गायबच झाली आहे.या दोन भावंडांनी मात्र आपली वेगळी ओळख बनविण्यात यश मिळवले. धर्मेंद्रची मुले असल्याचा त्यांना लाभ झाला खरा पण, त्यावाचून काही अडणार नाही याची काळजी या दोघांनीही घेतली. तुलनात्मकदृष्टीने विचार केला सनी देओल बॉबीपेक्षा जास्त यशस्वी राहिला. पण, म्हणून बॉबीच्या यशाला कमी लेखता येणार नाही.http://www.cnxdigital.com/assets/images/footer-icon.jpg