Join us

3828_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 06:11 IST

बॉलीवुडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या हॉलीवुडमध्ये चांगलीच चर्चेत आहे. अमेरिकेतील दूरचित्रवाहिनीवरील ‘क्वांटिको’ या मालिकेतील भूमिकेसाठी ‘पीपल्स चॉईस’ पुरस्कार पटकावलेल्या प्रियंकाला ८८ व्या आॅस्कर पुरस्काराच्या समारोहासाठी देखील विशेष आमंत्रितांमध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीयांसाठी ही बाब नक्कीच अभिमानास्पद असून, प्रियंकाला सातासमुद्रापार मिळत असलेल्या अफाट लोकप्रियतेचे बॉलीवुडकरांकडून देखील विशेष कौतुक केले जात आहे. त्यातच प्रियंका पाठोपाठ दीपिकाने देखील ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ जॅँडर कैज’ या अ‍ॅक्शन मुव्हिच्या माध्यमातून हॉलीवुडमध्ये एंट्री केल्याने बॉलीवुड-हॉलीवुड कनेक्शन सध्या चर्चेचा विषय बनला आहे. बॉलीवुडबरोबरच हॉलीवुडमध्येही दबदबा निर्माण करणाºया अशाच काही कलाकारांचा घेतलेला हा आढावा...

बॉलीवुडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या हॉलीवुडमध्ये चांगलीच चर्चेत आहे. अमेरिकेतील दूरचित्रवाहिनीवरील ‘क्वांटिको’ या मालिकेतील भूमिकेसाठी ‘पीपल्स चॉईस’ पुरस्कार पटकावलेल्या प्रियंकाला ८८ व्या आॅस्कर पुरस्काराच्या समारोहासाठी देखील विशेष आमंत्रितांमध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीयांसाठी ही बाब नक्कीच अभिमानास्पद असून, प्रियंकाला सातासमुद्रापार मिळत असलेल्या अफाट लोकप्रियतेचे बॉलीवुडकरांकडून देखील विशेष कौतुक केले जात आहे. त्यातच प्रियंका पाठोपाठ दीपिकाने देखील ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ जॅँडर कैज’ या अ‍ॅक्शन मुव्हिच्या माध्यमातून हॉलीवुडमध्ये एंट्री केल्याने बॉलीवुड-हॉलीवुड कनेक्शन सध्या चर्चेचा विषय बनला आहे. बॉलीवुडबरोबरच हॉलीवुडमध्येही दबदबा निर्माण करणाºया अशाच काही कलाकारांचा घेतलेला हा आढावा...बॉलीवुडमध्ये लोकप्रियता मिळविल्यानंतर हॉलीवुडमध्ये पर्दापण करण्याचे प्रत्येक सेलिब्रेटीचे स्वप्न असते. काहींना यात यश मिळते, तर काही सेलिब्रेटी शेवटपर्यंत स्ट्रगल करताना बघावयास मिळतात. असेच यश शाहरूख खानला मिळाले. कारण बॉलीवुडप्रमाणेच शाहरूख हॉलीवुडचाही खºया अर्थाने किंग आहे. हॉलीवुडच नव्हे तर इंटरनॅशनल लेव्हलला किंग खानचे फॅन्स आहेत. शाहरुखचे चित्रपट जगभरात रिलिज केले जात असल्याने त्याच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच्या चित्रपटांना जगभरातील प्रेक्षकांकडून पसंती मिळते, हे विशेष.शाहरूखबरोचर ऐश्वर्या रॉय-बच्चन देखील पहिली अशी अ‍ॅक्ट्रेस आहे जिला इंटरनॅशनल लेव्हलला ख्याती प्राप्त आहे. ऐश्वर्याने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि नाव कमाविले आहे. ऐशचे फॅन्स जगभरात आहेत.अभिनयाबरोबरच फॅशन जगतात, अल्पावधितच नाव कमाविलेल्या सोनम कपूरचे देखील हॉलीवुडमध्ये मोठ्या प्रमाणात फॅन्स आहेत. ती कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. हॉलीवुडमधल्या बºयाच इव्हेंटसाठी तिला स्पेशली इनव्हाइट केले जाते.‘लाइफ आॅफ पाई, स्लमडॉग मिलेनियर आणि जुरासिक वर्ल्ड’ यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या इरफान खानचा देखील हॉलीवुडमध्ये चांगलाच दबदबा आहे. अजुनही त्याला बºयाचशा हॉलीवुडपटाच्या आॅफर्स येत आहेत.इरफान बरोबरच स्लमडॉग मिलेनियरमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या अनिल कपूरचे देखील हॉलीवुडमध्ये वलय आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ या अ‍ॅक्शनपटात अनिलने भूमिका साकारली आहे. शिवाय आगामी काळात देखील तो हॉलीवुडच्या काही चित्रपटांमध्ये झळकण्याची शक्यता आहे.स्लमडॉग मिलेनियर या आॅस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाने आणखी एका कलाकाराला हॉलीवुडचे दरवाजे उघडून दिले. स्लमडॉग मिलेनियरमध्ये झळकलेल्या फ्रीडा पिंटोने अनेक हॉलीवुड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ‘डेजर्ट डांसर, इमोर्टल्स’ या चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. शिवाय तिने हॉलीवुडच्या अनेक नामांकित पुरस्कार सोहळ्यांमध्ये देखील हजेरी लावली.याशिवाय तब्बू आणि शिल्पा शेट्टी यांनी देखील एकेकाळी हॉलीवुडमध्ये दबदबा निर्माण केला आहे. तब्बूने ‘द नेमसेक आणि लाइप आॅफ पाई’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे हॉलीवुडमध्ये तिच्या फॅन्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर ‘बिग ब्रदर’ या अतिशय पॉप्युलर रिअ‍ॅलिटी शोचा किताब मिळविलेल्या शिल्पाचा देखील बॉलीवुडकरांना जलवा बघावयास मिळाला.